Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Loksabha Election 2024 : पुण्यातून मुरलीधर मोहोळ भाजपचे उमेदवार

पुणे : लोकसभेचे वारे वाहायला लागल्यापासून पुण्यामध्ये भाजपकडून अनेक इच्छुकांची नावे पुढे आली होती.  भाजपच्या वतीने आज दुसरी उमेदवारी जाहीर करण्यात आली, यामध्ये राज्यातील 20 जणांचा समावेश असून पुणे लोकसभेसाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या मोहोळ यांनी विविध विषय समित्या आणि स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपीएलचे साडेतीन वर्षे संचालक आणि अडीच वर्षे महापौर पद भूषविले आहे. मुरलीधर मोहोळ हे अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष ही होते. या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवत शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आपली एक मिनी खासदार अशी प्रतिमा निर्माण केली आहे. काही उपक्रम तर अनेक वर्षांपासून ते राबवत आहेत.

मोहोळ यांच्या कामाची आणि काम करण्याच्या पद्धतीची खरी ओळख झाली ती कोरोनाच्या काळात. या काळात ते महापौर होते. त्यांनाही कोरोनाने गाठले होते. मात्र, त्यातून बाहेर येत त्यांनी फेसबूकच्या माध्यमातून अखंडपणे जनसंवाद करत पुणेकरांना धीर दिला. त्यामुळे ‘कोरोनाला हरवणारा महापौर’ ते ‘कोरोनाग्रस्तांना आधार देणारा महापौर’ अशी प्रतिमा त्यांची जनमानसात झाली.
पुणे महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी त्यांनी १९१७-१८ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असताना अर्थसंकल्पामध्ये केलेली आर्थिक तरतूद, त्यासाठी तातडीने ट्रस्ट स्थापन करून राज्य सरकारची मान्यता आणि केंद्र सरकारच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनची मान्यता मिळवण्यासाठी केलेला पाठपुरावा, त्याला आलेले यश यामुळे पुण्यनगरीच्या मुकूटावर आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading