एएसके इनव्हेस्टमेंट मॅनेजर्सकडून त्यांचा पहिला सॅटेलाईट पीएमएस- एएसके लाईटहाऊस पोर्टफोलिओचा शुभारंभ
मुंबई : एएसके (ASK) इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड (“ASK”) ने एएसके लाईटहाऊस पोर्टफोलिओ शुभारंभ करत असल्याची घोषणा केली आहे. एएसकेचा हा पहिला सॅटेलाइट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) गुंतवणूक दृष्टीकोन आहे.
संरचनात्मत परिवर्तन सुरु असलेल्या आणि जे गुंतवणूकदारांना विस्तृत आणि मोठ्या संधी देतात, अशा क्षेत्रांचा उच्च-वाढीच्या टप्प्याचा लाभ उठविण्यासाठी प्रामुख्याने एका वेळी काही केंद्रित सकल्पना (थीम) अथवा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणे, हा या गुंतवणूकीतील दृष्टीकोन राहणार आहे. विविध कालखंडात गतीशीलतेची क्षमता असलेले म्हणजेच संकल्पना बदलण्याची लवचिकता असलेली क्षेत्र तसेच जे व्यापक गुंतवणूक तत्त्वज्ञानाची संकल्पना अबाधित राखतात. अशा गुंतवणूकीबाबतीत विविध संकल्पना टॉप-डाउन किंवा बॉटम-अप आधारावर तयार केल्या जाऊ शकतात, तर व्यवसायांची निवड ही प्रामुख्याने बॉटम-अप आधारावर केली जाईल. या नव्या गुंतवणूक संकल्पनेसाठी बेंचमार्क BSE 500-TRI हा आधारभूत निर्देशांक राहणार आहे.
आपल्या पोर्टफोलिओसाठी वैविध्यपूर्ण उपाय शोधत असलेल्या यूएनएचआय (अल्ट्रा हाय नेट वर्थ असलेल्या व्यक्ती), एचएनआय (उच्च नेट वर्थ असलेल्या व्यक्ती), कौटुंबिक कार्यालये, कॉर्पोरेट ट्रेझरी आणि खासगी कौटुंबिक ट्रस्टसाठी हा पोर्टफोलिओ दृष्टीकोन अतिशय योग्य पर्याय राहणार आहे.
याप्रसंगी बोलताना एएसके ॲसेट अँड वेल्थ मॅनेजमेंट ग्रुपचे एमडी आणि सीईओ श्री. सुनील रोहोकले म्हणाले.“विविधांगी पर्यायांसह पुढे जात असताना, आम्ही पीएमएस आणि एआयएफ क्षेत्रातील बाजाराच्या मजबूत वाढीचा फायदा घेत आहोत. पीएमएस उद्योग गेल्या 5 वर्षांत जवळपास दुप्पट झाला आहे. तो सुमारे 2.5 लाख कोटींवरून सुमारे 4.9 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलेला आहे. हा प्रवाह पुढील 8-9 वर्षात अंदाजे 8 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या अंदाजित वाढीशी मिळचाजुळता असेल. तसेच उच्च-उत्पन्न कुटुंबांमध्ये चार पट वाढ होऊन त्यांची संख्या सुमारे 60 लाख कुटुंबांवरुन अंदाजे 2.5 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. टियर टू आणि टियर थ्री शहरांमध्ये आमच्या उद्योगाच्या धोरणात्मक विस्तारासाठी आणि विकासासाठी आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण यातून आणखी प्रकट होत आहे.”
एएसके इनव्हेस्टमेंट मॅनेजर्सच्या विक्री आणि उत्पादने, व्यवसाय विकास आणि उत्पादने विभागाचे संचालक आणि प्रमुख श्री निमेश मेहता म्हणाले, “भारतातील संपत्ती निर्मितीचे हे सुवर्ण दशक आहे. लक्षणीय निधीचा ओघ सुरु असलेल्या पीएमएसच्या आधारे इक्विटी गुंतवणुकीत प्रचंड क्षमता आहे. एएसके लाइटहाउस पोर्टफोलिओच्या माध्यमातून सॅटेलाईट पीएमएस योजना गुंतवणूक पध्दतीत अर्थात दृष्टिकोनात आमचा प्रवेश झालेला आहे. भांडवलाचे संरक्षण आणि भांडवलाची वाढ हे आमच्या गुंतवणुकीचे मुख्य उद्दिष्ट कायम अबाधित राहील.”
एएसके इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे सहयोगी संचालक आणि वरिष्ठ पोर्टफोलिओ व्यवस्थापक श्री. संदीप बंसल याप्रसंगी आणखी भाष्य करताना म्हणाले, “हा पोर्टफोलिओ अशा संकल्पनांमध्ये गुंतवणूक करेल जेथे मूलभूत बदलांच्या प्रभावाची व्याप्ती जास्त असेल आणि ज्या टिकाऊ (क्षणिक नाही) आणि व्यापक स्वरूपाच्या असतील. व्यवसायाच्या उच्च-वाढीच्या टप्प्याचा लाभ उठविण्यासाठी काही क्षेत्रांवर आमचे अधिक लक्ष राहणार असून ते मार्केट-कॅप अर्थात बाजारमूल्य या संकल्पनेशी निगडीत नसेल.”
आणखी माहिती देताना ते म्हणाले, “या योजनेसाठी आम्ही सध्या लक्ष केंद्रीत केलेल्या क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी, ऊर्जा/ऊर्जा संक्रमण, संरक्षण, उत्पादन, रेल्वे, भांडवली वस्तू आणि संबंधित क्षेत्रांचा समावेश आहे. ही क्षेत्रे गुंतवणूकदारांसाठी भरपूर संपत्ती निर्मितीच्या संधी देत आहेत.”
एएसके लाइटहाऊस पोर्टफोलिओचे व्यवस्थापन संदिप बन्सल करणार आहेत. संदिप यांना या क्षेत्राचा 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, त्यापैकी 16 वर्षे ते शेअर बाजारामध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी एसबीआय लाइफ इन्शुरन्स, यूबीएस सिक्युरिटीज, कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज, केपीएमजी आणि सिटीबँकमध्ये अनेक उच्च पदांवर काम केले आहे. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि आयआयएम अहमदाबादमधून त्यांनी एमबीए केलेले आहे.
जानेवारी 2024 च्या सेबीच्या आकडेवारीनुसार ब्लॅकस्टोन-समर्थित ASK हे भारतातील सर्वात मोठे देशांतर्गत विवेकाधीन इक्विटी पीएमएस हाऊस (एफपीआय आणि ईपीएफओ वगळता देशांतर्गत सूचीबद्ध इक्विटी) आहे.
