Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरे यांनी अखेर राज ठाकरेंना केला जय महाराष्ट्र

पुणे :  लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला आहे. ‘अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा’ अशी फेसबुक पोस्ट लिहित वसंत मोरे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. राज ठाकरेंच्या तसवीरीसमोर लोटांगण घातल्याचा फोटो मोरेंनी शेअर केला आहे. वसंत मोरेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मोरे आता कोणत्या पक्षाची वाट धरणार, याची उत्सुकता आहे. वसंत मोरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो… त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो” असं लिहिलेली एक इमेज वसंत मोरे यांनी फेसबुकवर शेअर केली होती. सोमवारी रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी तात्यांनी ही पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे इतक्या रात्री मोरे कुठल्या विवंचनेत होते, याची काळजी समर्थकांना लागून राहिली होती. अखेर मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट लिहित निर्णय जाहीर केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading