Saturday, June 6, 2026
Latest NewsSports

आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स गुरुवारपासून

पुणे: विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग, शिअरफोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पोर्ट्स लीगमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. वानवडी येथील एस.आर.पी. एफ. मैदानावर दिनांक १४ ते १७ मार्च दरम्यान या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सचिव जितेंद्र पितळीया,प्राचार्य प्रसन्न देसाई यांनी दिली.

महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातील शृंगेरी श्रोत्री, समीक्षा वणवे, श्रेयस वाघ, सनी गुंजाळ तसेच सानिका ठिगळे व यश नाईक या विद्यार्थ्यांनी संयोजनामधे योगदान दिलेले आहे.

बास्केटबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये १८ ते २३ या वयोगटातील सुमारे ७०० मुला-मुलीं,१८० माजी विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये मुलांचे आणि मुलींचे एकूण ५० संघ सहभागी होतील. स्पर्धेचे उद्घाटन १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. स्पर्धेच्या उद्धाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गिर्यारोहक आणि मॅरेथॉन धावपटू किशोर धनकुडे, एसआरपीएफ कमांडंट नम्रता पाटील उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १७ मार्च रोजी होणार आहे.

विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्ट या संस्थेचे चेअरमन ॲड. अभय छाजेड,विश्वस्त व सचिव जितेंद्र पितळीया हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून पी. व्ही .पी वास्तुकला महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक अणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी या संपूर्ण कार्यक्रमात योगदान देत आहेत.

स्पर्धेमध्ये पुण्यातील १५ वास्तुकला महाविद्यालयातील संघाचा समावेश आहे. यामध्ये मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एम.एम. सी. ओ. ए.) , डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोहेगाव (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बी. एन. सी. ए.), अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (ए. सी. ओ. ए.), डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, अंबी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर (बी. एस. ओ. ए.), आयोजन स्कूल ऑफ डीझाईन (ए. एस. ए. डी.) , भारती विद्यापीठ डीम्ड युनीव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बी. व्ही. डी. यू.), सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एस. सी. ओ. ए.),एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पिंपरी चिंचवड (एस.बी.पी. सी.ओ.ए.),मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ एन्विरॉन्मेंटल डिझाईन,डी.वाय.पी.सी.ई.टी. कोल्हापूर,श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पी. व्ही.पी. सी. ओ. ए.)आदी महाविद्यालये स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading