पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग 2024 स्पर्धेत रॉकेट्स व स्पिअर्स यांच्यात अंतिम लढत
पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत रॉकेट्स, स्पिअर्स या संघानी अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रॉकेट्स संघाने 4 विजय, तर स्पिअर्स संघाने 3 विजयासह अंतिम फेरी गाठली. रॉकेट्स संघाने लॅन्सर्स संघाचा 460-426 असा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये लॅन्सर्स संघाने रॉकेट्स संघाला 182-128असे पराभूत केले. टेबल टेनिसमध्ये राहुल पाठक, तन्मय चोभे, केदार नाडगोंडे, आदित्य अभ्यंकर, सिद्धार्थ निवसरकर, कौस्तुभ वाळींबे, सारंग देवी, अद्वैत जोशी, राधिका इंगळहळीकर, निनाद देशमुख, राहुल मुथा, विराज खानविलकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर रॉकेट्स संघाने लॅन्सर्स संघाचा 185-121 असा पराभव करून आघाडी घेतली. टेनिसमध्ये रॉकेट्स संघाने लॅन्सर्स संघाचा 147-123 असा पराभव करून विजय मिळवला.
स्पिअर्स संघाने तलवार्स संघाचा 504-432 असा पराभव केला. सामन्यात बॅडमिंटनमध्ये सुधांशू मेडसीकर, तेजस किंजवडेकर, ईशान लागु तुषार नगरकर, अक्षय ओक, रोहित मेहेंदळे, नकुल ओगले, नीरज दांडेकर, मंदार विंझे, गिरीश मुजुमदार, अभिषेक ताम्हाणे, सौरभ प्रदुदेसाई यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर स्पिअर्स संघाने तलवार्स संघाचा 183-162 असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये स्पिअर्स संघाला तलवार्स संघाने 150-161 असे पराभूत केले. टेनिसमध्ये स्पिअर्स संघाने तलवार्स संघाचा 171-109 असा पराभव करून विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
रॉकेट्स वि.वि.लॅन्सर्स 460-426
बॅडमिंटन: रॉकेट्स पराभुत वि.लॅन्सर्स 128-182
(तन्मय चोभे/सिद्धार्थ निवासकर पराभुत वि.मिहीर विंझे/सारा नवरे 18-30; राधिका इंगळहळीकर/केदार नाडगोंडे पराभुत वि.इशान तळवळकर/संग्राम पाटील 0-30, आदित्य जितकर/अमोल मेहेंदळे पराभुत वि. हर्षद जोगाईकर/विनीत रुकारी 15-30; सोहम कांगो/आशुतोष सोमण वि.वि.अनिश रुईकर/रोहन पै 30-28; पार्थ केळकर/प्रांजली नाडगोंडे पराभुत वि.आनंद घाटे/स्वरूप कुलकर्णी 27-30, विक्रम ओगले/हिमांशू थोरात पराभुत वि.विनय राठी/जयकांत वैद्य 18-20; पार्थ किल्लेदार/शितल महाजनी वि.वि.आदित पाबळकर/सनमय तेलंग 20-14);
टेबल टेनिस: रॉकेट्स वि.वि.लॅन्सर्स 185-121
(राहुल पाठक/तन्मय चोभे वि.वि.किरण खरे/राजेश भट 30-12; केदार नाडगोंडे/आदित्य अभ्यंकर वि.वि.आनंद घाटे/जयदीप वाकणकर 30-24; सिद्धार्थ निवसरकर/कौस्तुभ वाळींबेवि.वि.संग्राम पाटील/सन्मय तेलंग 30-10; सारंग देवी/अद्वैत जोशी वि.वि.जयकांत वैद्य/भाग्यश्री देशपांडे 30-14; राधिका इंगळहळीकर/निनाद देशमुख वि.वि.जया पाटणकर/विनित रुकारी 30-27; कुणाल एस/आरिन माळी पराभुत वि.अदित पाबळकर/हर्षद जोगाईकर 15-20; राहुल मुथा/विराज खानविलकर वि.वि.चिन्मय दांडेकर/मिहिर विंजे 20-14);
टेनिस: रॉकेट्स वि.वि.लॅन्सर्स 147-123
(तन्मय चोभे/आदित्य अभ्यंकर वि.वि.संग्राम पाटील/सन्मय तेलंग 30-23; सारंग देवी/अर्णव काळे पुढे चाल वि.मिहिर दिवेकर/अंकुश मोघे 30-0; राहुल मुथा/रिया वाशिमकर वि.वि.जयदीप वाकणकर/आदित पाबळकर 30-24, राजेंद्र कांगो/निनाद देशमुख वि.वि. भाग्यश्री देशपांडे/आशिष कुबेर 30-21; अमेय वाकणकर/विराज खानविलकर पराभुत वि.चिन्मय चिरपुटकर/चिन्मय दांडेकर 21-30; केदार नाडगोंडे/आरिन माळी पराभुत वि.अश्विन हळदणकर/अनुष्का परांजपे 16-20; अमित महाजनी/सिद्धार्थ निवसरकर वि.वि.इशान तळवळकर/हर्षद जोगाईकर 20-05);
स्पिअर्स वि.वि.तलवार्स 504-432
बॅडमिंटन: स्पिअर्स वि.वि.तलवार्स 183-162
(सुधांशू मेडसीकर/तेजस किंजवडेकर वि.वि.विक्रांत पाटील/अंकित दामले 30-23; ईशान लागू/तुषार नगरकर वि.वि.रणजित पांडे/मकरंद चितळे 30-27; अक्षय ओक/रोहित मेहेंदळे वि.वि.नितीन कोनकर/आरुषी पांडे 30-28; नकुल ओगले/नीरज दांडेकर वि.वि.अतुल ठोंबरे/संदीप साठे 30-24; नेहा लागु/विश्वेश मोकाशी पराभुत वि.सचिन जोशी/मनीष शहा 23-30, मंदार विंझे/गिरीश मुजुमदार वि.वि.सिद्धांत खिंवसरा/विश्वेश कटक्कर 20-15; अभिषेक ताम्हाणे/सौरभ प्रदुदेसाई वि.वि.बाळ कुलकर्णी/संध्या भट 20-15);
टेबल टेनिस: स्पिअर्स पराभुत वि.तलवार्स 150-161
(रुचा अंबिके/अनिरुद्ध साठे वि.वि.शिल्पा पांडे/संजय बामणे 30-27; अभिषेक ताम्हाणे/नकुल ओगले पराभूत वि.रणजित पांडे/नील केळकर 17-30; रोहन छाजेड/तुषार नगरकर वि.वि. विक्रांत पाटील/नितीन कोनकर 30-27; तेजस किंजवडेकर/ ईशान लागु पराभुत वि.अतुल ठोंबरे/कुणाल भुरट 18-30, ओंकार वैद्य/प्रियदर्शन डुंबरे वि.वि.शिवकुमार जावडेकर/गोपिका किंजवडेकर 30-14; संजय शहा/अक्षय ओक वि.वि.सचिन जोशी/मनीष शहा 20-13; आशिष देसाई/सुमेधा दांडेकर पराभुत वि.प्रशांत पंत/अनिल आगाशे 5-20);
टेनिस: स्पिअर्स वि.वि.तलवार्स 171-109
(अनिरुद्ध साठे/कल्पक पत्की वि.वि.रणजित पांडे/शिवकुमार जावडेकर 30-14; अभिषेक ताम्हाणे/नकुल फिरोदिया पराभुत वि.रघुनंदन बेहरे/नील केळकर 11-30; तुषार नगरकर/रोहन छाजेड वि.वि.अभिषेक व्यास/ आनंद परचुरे 30-21; तेजस किंजवडेकर/प्रियदर्शन डुंबरे वि.वि.विश्वेश कटककर/समीहन मेहेंदळे 30-00; राहुल रोडे/नकुल ओगले वि.वि.कुणाल भुरट/चारुदत्त साठे 30-20; साकेत गोडबोले/सौरभ प्रभुदेसाई वि.वि.मकरंद चितळे/अंकित दामले 20-12; अक्षय ओक/सुधांशु मेडसीकर वि.वि.विक्रांत पाटील/आदित्य तापडिया 20-12);
