Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अकोल्यातील नागरिकांचा ‘मविआ’ला होर्डिंग्जच्या माध्यमातून सवाल !

शहरांत लागलेल्या बॅनर्सची मोठी चर्चा !

अकोला : लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधीही घोषित होऊ शकतात. मात्र, अजूनही महाविकास आघाडीचा जागा वाटपा संदर्भातील तिढा सुटला नाही. अशातच अकोला शहरात महाविकास आघाडीला अकोलाकर नागरिकांनी होर्डिंग्जच्या माध्यमातून सवाल उपस्थित केला आहे. या प्रश्नात अकोलाकरांनी म्हटले की, महाविकास आघाडी जर वंचित बहुजन आघाडीसोबत आहे. तर 2 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत अंतर्गत बैठका आणि चर्चेतून वंचितला दूर का ठेवले. याचे उत्तर द्या, वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीचा भाग असेल, तर अकोला लोकसभा मतदारसंघातुन प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा का जाहीर केला नाही? काँग्रेस या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवण्याची तयारी का करत आहे?

महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला जाणीवपूर्वक हारणाऱ्या 2 जागा का देऊ केल्या आहेत? त्या जागा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष गेल्या 15-20 वर्षांपासून जिंकलेल्या नाहीत. त्या जागा वंचित बहुजन आघाडीच्या माथी मारण्याचा का प्रयत्न केला जातोय? असा सवाल ही या बॅनरच्या माध्यमातून विचारला गेलाय.
अकोला शहरातील रतनलाल प्लॉट, अशोक वाटिका, बस स्टँड, अकोला पंचायत समिती, नेहरू पार्क, कृषी नगर, अकोला जिल्हा परिषदे जवळ हे बॅनर्स लागले आहेत.
अकोल्यातील नागरिकांमध्ये वंचितला जाणीवपूर्वक बाहेर ठेवल्या जात असल्याची चर्चा होत आहे. तसेच, मविआने याचे उत्तर लवकर द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading