डि.एस.के स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा झाला प्रकल्प दिवस
बाहुला-बाहुलीच्या लग्नातून राजस्थानी संस्कृतीचे अनोखे दर्शन…!
पुणे : पुण्यातील डि.एस.के स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाने नुकताच अनोख्या पद्धतीने प्रकल्प दिवस साजरा केला. यामधून ‘रंगीलो राजस्थान’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना राजस्थानी संस्कृती अनुभविली. यावेळी राजस्थानी संस्कृतीद्वारे बाहुला-बाहुलीचे लग्न लावल्या गेले.यावेळी लहान विद्यार्थ्यांनी या लग्नाची मजा लुटली. प्रचंड उत्साह यावेळी विद्यार्थ्यांमध्ये होता. सुरेख राजस्थानी कपडे, दागिने घालून बाहुला बाहुलीच्या लग्नात अतिशय उत्साहाने वऱ्हाडी बनून सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. राजस्थानी लोकांची वेशभूषा, दागिने, कपडे, कारागिरी, सणवार, तेथील किल्ले, राजवाडे आणि चवदार पारंपरिक पदार्थ यांचे एक छोटे प्रदर्शनचं याठिकाणी भरविण्यात आले होते. अशाप्रकारे मुलांनी राजस्थानी संस्कृतीचा अनुभव घेतला.