Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

माधुरी दीक्षित ठेवणार राजकारणात पाऊल ?

पिंपरी-चिंचवड : सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नुकतेच भाजप ने देखील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अशातच अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने देखील लोकसभा निवडणुकी संदर्भात मोठे विधान केले आहे. पिंपरी – चिंचवड येथे एका कार्यक्रमात आले असताना माध्यमांनी माधुरीला ‘लोकसभेची भाजपची ऑफर आहे?’, असा प्रश्न विचारला. त्यावर माधुरी ने ‘ऑफर असली तरी तुम्हाला का सांगू’ असं म्हणत राजकारणात येणार की नाही याबाबद सस्पेंस कायम ठेवला आहे.

अभिनय तर तुम्ही चांगला करताच पण राजकारणात येणार का?, असा प्रश्न विचारल्यावर माधुरी दीक्षित म्हणाली की, याबाबत मला खूप वेळा विचारले गेले आहे. मी एक कलाकार आहे. कला हे माझे क्षेत्र आहे. त्यातच मला रस आहे. राजकारण माझे क्षेत्र नाही. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून ऑफर आहे का, असे विचारले असता ‘मी ते तुम्हाला का सांगू’ असं म्हणत माधुरीने याबाबद सस्पेंस कायम ठेवला आहे.

दरम्यान, नुकतेच लोकसभेसाठी जाहीर झालेल्या भाजपच्या पहिल्या यादीत अभिनेत्री हेमा मालिनी  स्मृती इराणी तसेच अभिनेता रवी किशन आणि मनोज तिवारी यांची नावे आहेत. तर मुंबईतील एका जागेवर भाजपच्या वतीने पुन्हा एकदा कलाकारालाच संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अन् ते नाव माधुरी दीक्षित असावे असा अंदाज आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading