कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्सतर्फे कोटक गेन विमा योजना
मुंबई : कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (“कोटक लाइफ”) ने नागरिकांसाठी कोटक गेन ही जीवन विमा योजना आणल्याची आज घोषणा केली. ही एक नॉन-लिंक्ड सहभागी योजना असून ती दीर्घकालीन बचत/उत्पन्न देते. पॉलिसी जारी केल्याच्या पहिल्या महिन्यापासून पेआउट प्राप्त करण्यासाठी या विमा योजनेची रचना करण्यात आलेली आहे. कोटक गेन ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक उपायांसह सक्षम बनवते आणि परिपक्वतेच्या वेळी दीर्घकालीन नियमित किंवा एकरकमी उत्पन्नासाठी सानुकूलित पेआउटसाठी लवचिक पर्याय प्रदान करते.
कोटक गेन हे व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. ‘हम हैं… हमेशा’ या ब्रँड वचनाप्रमाणे, ग्राहकांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची कंपनीची वचनबद्धता गेन योजना अधोरेखित करते.
कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक महेश बालसुब्रमण्यम नव्या योजनेविषयी माहिती देताना म्हणाले, “कोटक लाइफमध्ये रोटेक्शन आणि दीर्घकालीन बचतीद्वारे आमच्या ग्राहकांना मूल्य प्रदान करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. गेनचे उद्दिष्ट ग्राहकांना दीर्घकालीन उत्पन्न देणारे आणि त्यांच्या प्रियजनांसाठी मजबूत संरक्षण सुनिश्चित करणारे सर्वसमावेशक समाधान प्रदान करणे हे आहे. कोटक गेनचे तिन्ही प्रकार ग्राहकांना दीर्घकालीन उत्पन्न तसेच विम्याचे मिश्रण प्रदान करतील. आम्हाला विश्वास आहे की गेन पॉलिसी व्यक्तींना त्यांची आर्थिक उद्दिष्टे आत्मविश्वासाने आणि मन:शांतीसह साध्य करण्यात मदत करेल.”
