Sunday, June 7, 2026
Latest NewsSports

गॅरी कस्टर्न क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !!

पुणे :  ग्रेसिया स्पोटर्स मॅनेजमेंट यांच्या तर्फे आयोजित ‘विराट करंडक’ १४ वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत अनेय पद्मेश याच्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर गॅरी कस्टर्न क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने रायझिंग क्रिकेट क्लबचा ४ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

धायरी येथील स्टार स्पोटर्स अ‍ॅकॅडमी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गॅरी कस्टर्न क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २५ षटकामध्ये १२६ धावांचे आव्हान उभे केले. अनेय पद्मेश याने २४ धावा, सामवेद गायकवाड (१९ धावा) आणि अक्क्षत बाजपेयी (१८ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. तिसर्‍या गड्यासाठी अनेय आणि अक्क्षत यांनी ५४ चेंडूत ५५ धावांची भागिदारी रचली. स्वरीत गाढवे याने २१ धावात ३ गडी बाद केले. या आव्हानासमोर रायझिंग क्रिकेट क्लबने १२२ धावा केल्या. श्लोक चव्हाण याने ३० चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. पण, सामना जिंकण्यासाठी संघाला ४ धावा कमी पडल्या. गॅरी संघाच्या आलप पंगु, अनेय पद्मेश, ज्योर्तिदीत्य कोकरे आणि रेहान पठाण यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय साकार केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक आणि संयोजक अनिकेत कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या गॅरी कस्टर्न क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला आणि रायझिंग क्रिकेट क्लबला करंडक देऊन गौरविण्यात  आले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
गॅरी कस्टर्न क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ९ गडी बाद १२६ धावा (अनेय पद्मेश २४, सामवेद गायकवाड १९, अक्क्षत बाजपेयी १८, स्वरीत गाढवे ३-२१, राघव शेवाळे १-८);(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी अनेय आणि अक्क्षत यांच्यात ५५ (५४) वि.वि. रायझिंग क्रिकेट क्लबः २४.४ षटकात १० गडी बाद १२२ धावा (श्लोक चव्हाण ५० (३०, ५ चौकार, ४ षटकार), यथार्थ जगदाळे १८, स्वरीत गाढवे १९, आलप पंगु ३-२४, अनेय पद्मेश ३-२५, ज्योर्तिदीत्य कोकरे २-०, रेहान पठाण २-११); सामनावीरः अनेय पद्मेश;

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः शाश्वत पांड्या (अष्टपैलु स्पोटर्स, ३५८ धावा, १३ विकेट);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः शाश्वत पांड्या;
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः प्रांजली पिसे (एके स्पोटर्स, १६ विकेट);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading