Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

विद्यापीठातर्फे अधिसभा सदस्यांसाठी निवासी कार्यशाळेचे आयोजन

पुणे  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने अधिसभा सदस्यांसाठी दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्धाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले असून याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, अधिसभा सदस्य डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. बाळासाहेब सागडे, श्रीमती. बागेश्री मंठाळकर, श्री. रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्रा. डॉ. धोंडीराम पवार, श्रीमती बागेश्री मंठाळकर, प्रा. डॉ. संगीता जगताप, प्रा. संदीप पालवे यांच्यासह अधिसभा सदस्य, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना, विद्यापीठाचे कामकाज अधिक गतिशील होण्यासाठी, कामकाजात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होण्यासाठी या कार्यशाळेची मदत होणार असल्याचे मत कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रगती अतिशय जोमाने सुरू आहे. अनेक जुन्या विद्यापीठाच्या तुलनेत ही प्रगती आश्वासक असून हे सर्व घटकांच्या सहभागामुळे शक्य होऊ शकले, असे प्रतिपादन प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे यांनी केले.

लोणावळा येथील महाशक्ती प्रयोग केंद्रात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत डॉ. आर. एस. माली हे ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६’, डॉ. गजानन एकबोटे हे ‘अधिसभा सदस्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या’, डॉ. एस. पी. लवांडे हे ‘अधिसभेशी संबंधीत परिनियम’,  विनायक आंबेकर हे’ एनईपी-२०२० च्या अंमलबजावणीतील आव्हाने’ आणि प्रा. डॉ. पंडित विद्यासागर हे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ या विषयावर अधिसभा सदस्यांचे मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेची सांगता शनिवारी २ मार्च रोजी होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading