महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा..! फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा कॉँग्रेसची मागणी
पुणे – शिवछत्रपतींच्या,संताच्या व क्रांतीकारकांच्या महाराष्ट्राच्या भुमित ते देखील ‘कायदा-सुरक्षेचे संरक्षक’ असलेल्या दस्तूर खुद्द “पोलीस स्टेशन” मध्येच सत्ताधिश भाजप आमदार गोळ्याझाडून दिवसा ढवळ्या खून करण्याचा प्रयत्न करतात.. व हे महाराष्ट्राच्या राजधानी लगतच्या परीसरात घडते आहे..(?) हे अत्यंत धक्कादायक कृत्य असून, कायदा सुव्यवस्था व गुंडाराज कोणत्या स्तरावर गेला याचे ज्वलंत ऊदाहरण आहे..! राज्यातील त्रिकूट सरकार मध्ये सहभागी असलेल्या सत्ताधिश पक्षातील नेत्यांची “जमीन, जागा व संपत्तीची” ची स्पर्धा व द्वेष-असुया कोणत्या शिगेला पोहोचली आहे यांचे हे द्योतक आहे.
राज्यात गुन्हेगारीचा (क्राईम रेट) वाढला असून, उच्च न्यायालयाने त्रिकुट सरकार मधील ‘फडणवीसांच्या गृहखात्यावर’ या पुर्वीच अत्यंत खालच्या पातळीवर ताशेरे ओढले असूनही, राज्यात अद्यापही सर्वसामान्य नागरिकांच्या जीवास सुरक्षा नसल्याचेच या घटनेतून प्रत्ययास आले आहे..! पोलीस स्टेशन मधील भाजप आमदाराने केलेल्या गोळीबाराचा तीव्र निषेध करून, राज्याचे ऊपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
भाजप प्रदेश अध्यक्ष व मकाऊ येथे जुगारीत कोट्यावधींची ऊधळण करणाऱ्या चंद्रकांत बावनकूळे यांनी तर अकलेचे तारे तोडत.. “भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडल्या काय(?) हे तपासावे लागेल” असे धक्कादायक व खेदजनक विधान करणे म्हणजे भाजपच्या गुन्हेगारी आमदाराची पाठराखण करण्याजोगे निंदनीय विधान आहे..!
आज सकाळी देखील भाजप खा अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांना अपशब्द बोलून महिलां विषयी सभ्यता व संस्कारास फाटा देऊन विक्ृतीचेच दर्शन ऊभ्या महाराष्ट्रास घडवले या घटनांचा तीव्र निषेध करून काँग्रेस पक्षातर्फे अनिल बोंडे, बावनकुळे व फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत असल्याचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. ते पुढे म्हणाले की,
या घटनेवर प्रतिक्रिया देतांना भाजप नेते देवेंद्र फडणवीसांना किमान या घटनेचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षांत घेऊन डोक्या वरील फेटा काढून यावर गृहमंत्री म्हणून प्रतिक्रिया देण्याचे सुचले नाही काय..?
भाजप नेते कोणत्या मस्तीत वावरतात..(?) हीच राम – राज्या ची सुरवात आहे काय..(?) असा संतप्त सवाल ही काँग्रेस ने केला..!
