Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

मिरे असेट फ़ाऊंडेशनद्वारे मुंबईमधील बीएमसी शाळांमध्ये आधुनिक शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी महत्वाचे पाऊल.

मुंबई : भारतातील मिरे असेट व्यवसायाचा सीएसआरचा भाग असलेल्या, मिरे असेट फ़ाऊंडेशन (एमएएफ़), च्या शैक्षणिक इन्फ़्रास्ट्रक्चर सपोर्ट प्रोग्राम (एमईफ़ ईआयएसपी) आणि एक्सट्रामार्क्स एज्युकेशन फ़ाऊंडेशन, नॉईडा यांनी एकत्र येऊन आज मुंबईमधील चार बीएमसी शाळांमध्ये यशस्वी पद्धतीने सात नव्या डिजिटल वर्गांची स्मार्ट इंटरॅक्टिव पॅनलसह उभारणी केली. हा एकत्रित उपक्रम, संस्थेचा इन्फ़्रास्ट्रक्चर सपोर्ट प्रोग्रामचा एक भाग असून यामुळे 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे, व त्यांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्याकरिताचे हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

मिरे असेट फ़ाऊंडेशनचे संचालक श्री.रितेश पटेल आणि एक्सट्रामार्क्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.अलोक सिन्हा यांचा हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून, त्यांनी अंधेरी आणि विले पार्ले, मुंबई येथील चार बीएमसी शाळांमधून सात नव्या डिजिटल वर्गांचे एलईडी – वर आधारीत इंटरॅक्टिव फ़्लॅट पॅनलचे अनावरण केले. या सात स्मार्ट इंटरॅक्टिव पॅनेल, मध्ये एक्स्ट्रामार्क्स एज्युकेशनल कंटेन्टचा समावेश असून तो न्यु एज्युकेशन पॉलिसी (एनईपी) मार्गदर्शक 2020 वर आधारीत आहे.

मिरे असेट फ़ाऊंडेशनचे , संचालक रितेश पटेल हे स्मार्ट पॅनेलचा सकारात्मक परिणामवर जोर देत असताना ते म्हणाले, “इन्स्टॉल केलेले हे स्मार्ट इंटरॅक्टिव पॅनल्स ही विद्यार्थ्यांना शिक्षकांसह गुंतवूण ठेवत अभ्यासातील त्यांचा सहभाग तर वाढवतीलच पण त्याच बरोबर त्यांना नवीन युगातील आधुनिक शिक्षणाचा लाभ घेता येईल आणि व्हिज्युअल डिजिटल घटक आणि ऑडियो उपलब्धीमुळे त्यांची शिकण्याची पद्धती अधिक आनंददायी आणि परिणामकारक ठरेल. शिक्षकांचा प्रशिक्षण सत्रांमुळे शिक्षकांना तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षण वर्गातून कसे देता येऊ शकेल हे शिकायला मिळेल.”

एक्सट्रामार्क्सचे, वरीष्ठ उपाध्यक्ष, अलोक सिन्हा म्हणाले, “ एक्सट्रामार्क्सचा हेतूच हा मुलांकरिता आनंददायी शिक्षणाचा अनुभव  उपलब्ध करून देण्याचा असून आमचा इनबिल्ट एज्युकेशन घटकांसह दीर्घकाळ आणि सुधारीत असे शिक्षणाचे कार्य करता येते ज्यामुळे विद्यार्थी आपल्या भविष्याकरिता तयार होतात. बीएमसी शाळांमधील मुलांना या उपक्रमाचा लाभ होत असल्याचे पाहून आम्हाला अतीशय आनंद होतो आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading