अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावारेची ‘चट मंगनी, पट ब्याह’
अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावारे यांनी आज आपल्या साखरपुड्याचे फोटो शेयर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या पाठोपाठ या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले. म्हणजे आता ‘चट मंगनी, पट ब्याह’ करत अजिंक्य आणि शिवानी हे सेलेब्रिटी कपल सुद्धा लग्न बंधनात अडकले आहे.

अजिंक्य सध्या झी मराठी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर शिवानी ही नुकताच सुपरहीट ठरलेल्या झिम्मा 2 या मराठी चित्रपटात झळकली आहे. आज त्यांच्या लग्नाला झिम्मा 2 चित्रपटातील कलाकार सुहास जोशी, सायली संजीव व दिग्दर्शक हेमंत ढोमे आदींनी देखील हजेरी लावली.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अजिंक्य आणि शिवानी दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. अखेर त्यांनी आज लग्न गाठ बांधली आहे.

लग्नाला होता घरच्यांचा विरोध ……
शिवानीने ‘देवयानी’ या मालिकेच्या माध्यमातून शिवानी घराघरांत पोहोचली आहे. नुकतेच तिचे ‘वाळवी’ आणि ‘झिम्मा 2’ हे सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. तर अजिंक्य हा सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

पण शिवानी-अजिंक्यची पहिली भेट ही ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या सेटवर मैत्री झाली होती. मालिका संपल्यानंतर त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली.

तसेच मैत्रीपलीकडे काहीतरी आहे, असं त्यांना वाटू लागलं अन् त्यांनी डेटिंग करायला सुरूवात केली. गेल्या आठ वर्षांपासून म्हणजेच 2016 पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. शिवानी आणि अजिंक्यच्या लग्नाला सुरुवातीला दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता.

मात्र, त्यानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ही जोडी कधी लग्न करणार यांची उत्सुकता प्रेक्षकांना होतीच, अखेर आज अजिंक्य आणि शिवाणीने शुभमंगल केले आहे.
