Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

क्रिकेट आपल्याला सजगता आणि सातत्याने क्रियाशील राहणे शिकविते – सुनंदन लेले

पिंपरी : क्रिकेट हा खेळ आपल्या सर्वांना सजगता आणि सातत्याने क्रियाशील राहणे शिकविते असे मत ज्येष्ठ किडा समीक्षक सुनंदन लेले यांनी व्यक्त केले. यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्यावतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संत तुकारामनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे आयोजित ‘यशस्वी प्रीमियर लीग’क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी पारितोषिक वितरण करताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, एखाद्या विद्यार्थ्याने नियमितपणे वर्गात जाऊन शिक्षण घेतले, नियमित सलग वर्षभर अभ्यास केला तर या सातत्याने परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्याची शक्यता नक्कीच निर्माण होते, मात्र अगदी अष्टपैलू आणि अनुभवी खेळाडू असेल, तरीही पहिल्या चेंडूवर बाद होण्याची संभाव्य शक्यता क्रिकेटमध्ये असते, ही यशाबद्दलची अनिश्चितताच आपल्याला अधिक सजग आणि कुशल बनवते.
यशस्वी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे अतिशय उत्साहाने क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेतला त्याप्रमाणेच त्यांनी आपापल्या ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये कंपनीतील शॉपफ्लोवर कार्यरत असतानासुद्धा सजगता आणि कुशलता अंगी बाणवायला हवी असे सुनंदन लेले यांनी सांगितले.
सलग दोन रविवार आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेत विविध नामांकित औद्योगिक आस्थापनांमधून यशस्वी संस्थेच्यामाध्यमातून शिका व कमवा योजना तसेच अप्रेन्टिस योजनेद्वारे ऑन द जॉब ट्रेनिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वीस संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत एफएफपीएल – बी संघाला पराभूत करून एकसाईड बॅटरी कंपनीतील यशस्वी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा संघ अंतिम विजेता ठरला. याप्रसंगी अंतिम सामन्यात विजेता संघ व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विक्रम येलमार याला तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून रोहित चलवादी व सामनावीर ठरलेल्या सोहेल पटेल या खेळाडूंनाही पारितोषके प्रदान करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading