Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची कार्यकारिणी जाहीर

पिंपरी  : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नवीन पदनियुक्ति कार्यक्रम पक्षाच्या पिंपरी चिंचवड येथील मुख्य पक्ष कार्यालयात घेण्यात आला.

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाची कार्यकारिणी, शहराध्यक्ष तुषार कामठे व सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मयूर जाधव यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आली. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच शरद पवार साहेबांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे नेते तयारीला लागल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.

सदर पदनियुक्ती कार्यक्रमाला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील सुनील मल्हारी कांबळे, रवी श्रीरंग पवार यांची सचिवपदी तर अविनाश सकट आणि मंगेश बनसोडे यांची सामाजिक न्याय विभागाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, जेष्ठ मार्गदर्शक शिरीष जाधव, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस के. डी. वाघमारे , शहर संघटक विवेक विधाते यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी काशिनाथ बामणे, अण्णासाहेब पाखरे, गणेश काळे, रोहित जाधव, अविनाश कांबळे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading