सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
भारतातील प्रथम आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल व विदर्भातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत शिक्षण पोहचविण्याचे कार्य भाऊसाहेबांनी केले असे प्र -कुलगुरु डॉ. काळकर यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी वित्त व लेखाधिकारी चारुशीला गायके,डॉ. राधाकृष्ण पंडीत,संचालक, कौशल्य विकास केंद्र तसेच शैक्षणिक व प्रशासकिय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
