Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

पश्चिम विभागीय (स्तर) अन्वेषण स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ कोल्हापूरला रवाना

पुणे : ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ने आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय (स्तर) अन्वेषण स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अन्वेषण संघ कोल्हापूरला रवाना झाला आहे. सदर स्पर्धा दिनांक २८ ते २९ डिसेंबर २०२३ दरम्यान शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे होणार आहे. हा संघ प्रस्थान करण्यापूर्वी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा (डॉ.)सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू प्रा (डॉ.)पराग काळकर व प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे यांनी संघास शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठातील विविध विभागाचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. शेती, मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान, सामाजिक विज्ञान मानसशास्त्र, वाणिज्य आणि कायदा आणि आंतर्विद्याशाखीय संशोधन अशा विविध प्रकारात यात संघ सादरीकरण करणार आहे.

पश्चिम विभागीय (स्तर) अन्वेषण स्पर्धेसाठी सहभागी संघ खालीलप्रमाणे
१. संघ अधिकारी :- प्रा. संजय ढोले
२.संघ व्यवस्थापक :- प्रा. राधाकृष्ण टाणगे

३. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान: – अमोल मार्टिन सोनवणे

४.मूलभूत विज्ञान प्रवर्ग:- १.अवंती अतुल पुराणिक
२. श्रावणी दीपक निघोट
३.प्रज्ञा महावीर मगदूम

५.कृषी प्रवर्ग:- वैभव सुंदरदास नागरगोजे
६.आरोग्य विज्ञान प्रवर्ग:- १.अनुष्का विश्वनाथ शिंदे
२. श्रेया उदय लोहकरे
३. निखिल प्रमाप मराठे

७.सामाजिक विज्ञान मानसशास्त्र, वाणिज्य आणि कायदा:- प्रथमेश पंडीत खेडकर

८.आंतर्विद्याशाखीय संशोधन प्रवर्ग :- नामदेव भगवान ठोंबरे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading