मुंबईतील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनाचे विजय सेल्सद्वारे आयोजन
मुंबई : मुंबईतील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन आयआयसीएफ कंझ्युमर एक्स्पोच्या घोषणेसह विजय सेल्स ही भारतातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळी तंत्रज्ञानप्रेमी व ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यास सज्ज आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राऊंड्सवर आयोजित करण्यात आलेलया या प्रदर्शनात ६५ हून अधिक इलेक्ट्रॉनिक ब्रँडची उत्पादने स्वस्त दरात विक्रीसाठी सादर केली जाणार आहेत. यामध्ये सॅमसंग, एलजी, सोनी, अॅप्पल, वनप्लस, बोट, हायर, व्हर्लपूल, असुस, हिताची, गोदरेज, आयएफबी, मॉर्फी रिचर्ड्स, फिलिप्स, वंडरशेफ, एआय स्मिथ अशा लोकप्रिय ब्रॅण्ड्सचा समावेश आहे. हे १६ दिवसीय प्रदर्शन ८ जानेवारी २०२४ पर्यंत ग्राहकांसाठी खुले राहील. ग्राहकांना बेस्ट-इन-टेक ब्रॅण्ड्सचे नवीन लॉन्चेस व विविध ऑफरिंग्जचा अनुभव देण्यासाठी, त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी हे प्रदर्शन डिझाइन केले असल्याचे विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता यांनी सांगितले.
सर्व ब्रॅण्ड्सचे स्वत:चे विभाग असतील, जे ग्राहकांना नवीन गॅझेट्स खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी देतील. ५०,००० चौरस मीटर जागेवर पसरलेले हे प्रदर्शन विविध इलेक्ट्रॉनिक विभागांमधील उत्पादनांची सर्वात मोठी श्रेणी दाखवते. उत्पादनांना जवळून पाहण्याची संधी देण्याचा या प्रदर्शनाचा मनसुबा आहे. ग्राहकांना लाइव्ह कूकरी प्रात्यक्षिकांचा, तसेच ब्रॅण्ड्सनी लाँच केलेल्या नवीन उत्पादनांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.
