22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत सांगवी एफसी ब, हायलँडर एफसी संघांची विजयी सलामी
पुणे – गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित 22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीत सांगवी एफसी ब, हायलँडर एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
खडकी येथील रेंजहिल्स स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीत सांगवी एफसी ब संघाने रेंजहिल्स मिलान एफसी संघाचा टायब्रेकरमध्ये 5-3 असा पराभव करून आगेकूच केली. सांगवी एफसीकडून संदन नाणेकर(21 मि) याने तर, रेंजहिल्स मिलान(शुभम महाले 28मि.) यांनी एक गोल केला. निर्धारित वेळेत सामना बरोबरी सुटल्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये सांगवी एफसी ब संघाकडून निखिल शिंदे, रोहित कांबळे, संदन नाणेकर, दिवेश शेवाळे यांनी गोल केले. तर, रेंजहिल्स मिलान एफसी संघाकडून कुणाल आवळे, हसन शेख यांना गोल मारण्यात अपयश आले.
चुरशीच्या लढतीत हायलँडर एफसी संघाने खडकी ब्लुज एफसी संघाचा 4-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. निर्धारित वेळेत सामना गोल शून्य बरोबरीत सुटला व त्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आली. विजयी संघाकडून साई देशमुख, कौस्तुभ शिंदे, आयुष दिवार, इरफान शेख यांनी गोल केले., तर खडकी ब्लुज एफसीकडून श्रीकल्प बोराडेने चेंडू बाहेर मारला.
निकाल: बाद फेरी:
सांगवी एफसी ब: 5 (संदन नाणेकर 21 मि.(पास-निखिल नायर), निखिल शिंदे, रोहित कांबळे, संदन नाणेकर, दिवेश शेवाळे) टायब्रेकरमध्ये वि.वि.रेंजहिल्स मिलान एफसी : 3 (शुभम महाले 28 मि.पास -हसन शेख, शुभम महाले, जेम्स मर्फी)(गोल चुकविले – कुणाल आवळे, हसन शेख);
हायलँडर एफसी: 4(साई देशमुख, कौस्तुभ शिंदे, आयुष दिवार, इरफान शेख)टायब्रेकरमध्ये वि.वि.खडकी ब्लुज एफसी: 3(अँड्र्यू स्वामी, प्रेम पिल्ले, प्रवीण गवळी)(गोल चुकवले: श्रीकल्प बोराडे); पुर्ण वेळ:0-0.
उद्याचे सामने(26 डिसेंबर 2023):
11.30 युकेएम ब वि.अशोका एफसी
12.30 युकेएम अ वि.आयफा स्काय हॉक्स
2.00 इन्फन्ट एफसी वि. आर्यन्स एफसी
3.30 थंडरकॅट्स एफसी वि. रुपाली एफसी.
