समानतेचा संदेश देत ‘ ख्रिसमस संध्या’ उत्साहात!
पुणे : दरवर्षी साजरा होणारा ख्रिसमस संध्या यंदा बालगोपाळांबरोबरच त्यांच्या पालकांसाठीही आनंदाची पर्वणी ठरली. समानतेचा संदेश देताना तिरंगी फुगे आकाशात सोडून ‘ ख्रिसमस संध्या’ उत्साहात साजरा करण्यात आला.
निमित्त होते, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या सर्वधर्मीय नागरिकांसमवेत ख्रिसमस संध्या कार्यक्रमाचे. शिवदर्शन येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वधर्मियांसमवेत ख्रिसमस संध्या कार्यक्रम हजारो मुलामुलींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, संजय बालगुडे , शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, नरेंद्र व्यवहारे, शानी नौशाद,पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल ,पर्वती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कामठे, विक्रम खन्ना, रितेश अगरवाल, अमित भगत, रमेश अय्यर, विश्वास दिघे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे झुजर पूनावाला, ताई कसबे,अमित सुर्वे,नवनाथ भोसले, संयोजक अमित बागुल ,चंद्रशेखर पिंगळे,पुणे नंदकुमार बानगुडे,घन:श्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, विलास रत्नपारखी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
आबा बागुल म्हणाले कि,भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत हे आपण बालवयापासून म्हणत आहोत.म्हणजेच देशात सर्वधर्मसमभाव आहे आणि तो केवळ काँग्रेस पक्षामुळेच आहे आणि काँग्रेस पक्षाची ही शिकवणूक आहे. त्यामुळे गेली २३ वर्षे हा उपक्रम साजरा केला जातो. यंदा २४ वे वर्ष ख्रिसमस संध्याचे आहे तसेच लोकोपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात.
ख्रिसमस संध्यानिमित्त यावेळी उपस्थित बालचमूंना रोज आई-वडिलांची सेवा आणि देशाचे रक्षण करण्याची शक्ती देवदूताकडे करण्यासाठी शपथ देण्यात आली.स्त्री जन्माचे स्वागत, पर्यावरण जतन,पाणी बचतीचा संदेश यावेळी फलकामधून देण्यात आला. सूत्र संचालन संयोजक अमित बागुल यांनी केले. सांताक्लॉजच्या हस्ते भेटवस्तू स्वीकारत ,खाद्य पदार्थांचा आस्वाद यावेळी बालचमूंनी घेतला.संगीत, नृत्य,जादूचे प्रयोग, कॅमल राईड आदी विविध कार्यक्रमांचाही बालचमूंनी मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर बागुल, सागर आरोळे,महेश ढवळे ,अभिषेक बागुल ,इम्तियाज तांबोळी, बाबासाहेब पोळके, धनंजय कांबळे, हरीश शिंदे,वसीम शेख, सूरज सोनवणे, किशोर भालेराव ,राम रणपिसे,इर्शाद शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.
