Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

Movie review : ‘डंकी’

‘किंग खान’ (King Khan) अर्थात  शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित डंकी हा चित्रपट रिलीज झाला आहे. ‘पठाण’ (Pathan), ‘जवान’ (Jawan) या दोन ब्लॉक ब्लास्टर चित्रपटानंतर शाहरूख खानचा हा या वर्षातील तिसरा चित्रपट. त्यात राजकुमार हिरानी ((Rajkumar Hirani) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘पिके’ (Pk) आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (Munna bhai MBBS) या दोन चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी हुकल्यानंतर आता SRK आणि राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani)) फायनली एकत्र काय भन्नाट घेवून येणार? याची प्रतीक्षा होती.

‘डंकी’ या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हाच चित्रपटाच्या नावा बद्दल उत्सुक्ता होती. तसेच चित्रपटाचा टीसर देखील ड्रॉप १,२,३,४ अश्या स्वरूपात आल्याने चित्रपट नक्की काय आहे. अन् कशावर आहे? हे कळाले होते. भारत आणि जगभरातून जवसापास दहा हजार नागरिक प्रत्येक वर्षी अवैधरित्या इंग्लंड पर्यंत पोहोचतात. याच सत्य घटनेवर आधारीत हा चित्रपट आहे. अन् दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी हा प्रवास पडद्यावर कश्या प्रकारे उतरवतात हेच पाहण्यासाठी थिएटरमध्ये जायचं होतं.

डंकी या चित्रपटात पाच मित्रांची कथा आहे.  मंन्नु (Taapsee Pannu), सुखी (Vicky Kaushal), बुगगु (Anil Grover), बलींदार (Vikram Kochchar) या चौघांना खूप पैसे कामावण्यासाठी पंजाबहून इंगलंडला जायचे असते. अन् तिथे त्यांना पोचवण्यासाठी हार्डी म्हणजेच शाहरूख खान मदत करतो. इंगलंडला जाण्यासाठी हे लोक इंग्रजी शिकतात. अभिनेते  बोमन ईराणी (Boman Irani) यांनी यामध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाची भूमिका साकारली आहे. पण इंग्रजी शिकण्याचाही काही उपयोग होत नाही. अन् त्यामुळे त्यांचा व्हिसा देखील नाकारला जातो. मग त्यानंतर ते बेकायदेशीर रित्या इंग्लंडला जाण्याचे ठरवतात. यालाच ‘डंकी ड्राइव’ असे म्हटले जाते. ज्यात छुप्या प्रकारे पाण्यातून, वाळवंटातून, कंटेनरमधून जीव हातात घेवून लोकं इंग्लंडला पोहचतात. पण ज्या दीखाव्याच्या मोहात ते परदेशात गेलेले असतात. वास्तवात तस काही नसतं .. मग हे चार जण इंग्लंडवरून परत भारतात येतात का? त्यांना पुढे कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते. परदेशात त्यांना कोणती वागणूक मिळते. हे सगळं चित्रपटात दाखवलेलं आहे.

या चित्रपटात शाहरूख खानचा अभिनय पाहताना सारखा ‘वीर – झारा’ चित्रपट पाहिल्याचा फील येतो. इंटरव्हल पर्यंतचा चित्रपट हसवणारा असला तरी बोरींग वाटतो. स्टोरी डेव्हलप करण्यात दिग्दर्शकाने जास्त वेळ घेतला आहे. त्यामानाने पुढचा चित्रपट हा आटोपता घेतल्याचे जाणवते. सुखी (Vicky Kaushal) याची भूमिका छोटीशीच आहे. पण कथेला कलाटणी देणारी आहे. हे पात्र तुम्हाला हसवते पण अन् दुसऱ्याच मिनिटाला रडवते पण.

दोन तास ४१ मिनिटांचा हा इमोशनल ड्रामा असला तरी देखील प्रेक्षकांवर छाप सोडण्यास हा चित्रपट कमी पडलाय. चित्रपाची गाणी चांगली असली तरी कोठेही प्रेक्षक चित्रपटाशी कनेक्ट होत नाहीत. शिवाय दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच दिग्दर्शन शाहरूख खान या वलयांकीत अभिनेत्यांमुळे झाकोळून गेल्याचं किंवा कमी पडल्याचं जाणवतं. त्यामुळे नेहमीच ब्लॉक बस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यंदा मात्र आपला रेकॉर्ड तोडणार की काय ? असं चित्र आहे.

शेवटी सांगायचं म्हटलं तर तुम्ही माझ्या सारखे SRK फॅन असताल तर, एकदा जावून चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही. पण फार अपेक्षा ठेवू नका .

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading