Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNESports

पंचवीस हजार पुणेकर धावणार आपल्या पुण्यासाठी

पुणे :  माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या वतीने रन फॉर पुणे या मॅरथॉन पुणे-थॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवीस हजार पुणेकर या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत.

जगदीश मुळीक म्हणाले, पुणे हे देशातील सर्वात वेगाने महानगर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जगातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने विविध विकासकामे सुरू आहेत. पुणेकर आपले वैशिष्ट्ये त्याचा पुणेकरांना सार्थ अभिमान आहे. पुण्या प्रतीच्या या भावना व्यक्त करण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा शनिवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी साडे पाच वाजता सुरू होणार आहे.

टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी २५ हजार स्पर्धकांनी नोंदणी केली आहे.

तीन किलोमीटर, पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर या तीन गटांत या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी १५ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading