Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENTLatest News

अखेर रूपालीचं सत्य अव्दैतला समजणार!!

प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण जवळ आला आहे. कधी एकदा रूपालीचं सत्य अव्दैतला कळतंय, असं प्रेक्षकांना वाटत होतं. प्रेक्षकांची ही इच्छा २४ डिसेंबरच्या महाएपिसोडमध्ये पूर्ण होणार आहे. नेत्रा इंद्राणीने जंगलात सर्पलिपीच्या अर्थाविषयी लपवून ठेवलेलं रहस्य रूपालीला नागामुळे कळतं. त्यात तिला कळतं की ती विरोचक आहे. त्याचबरोबर कलियुगात तिचा सेवक अव्दैतच्या रूपात वावरत आहे.

रूपालीला विरोचकाचं सत्य कळल्याचं नेत्रा इंद्राणी आणि शेखरला आश्चर्य वाटतं. आता काहीही करून अव्दैतला जपायला हवं त्याचबरोबर रूपालीचं खरं रूप उघड होण्यासाठी योजना आखायला हृवी, असं ते तिघे ठरवतात.

अव्दैत नेत्राला प्रश्न विचारतो की जर मी विरोचकाचा सेवक होतो, तर कलियुगात आता विरोचक कोण आहे. त्याचवेळी नेत्रा ठरवते की आता अव्दैतपासून सत्य लपवण्यात काहीच अर्थ नाही. योजना आखल्याप्रमाणे नेत्रा इंद्राणी आणि शेखर, रूपालीला आपल्या जाळ्यात ओढतात. रूपालीला त्यांच्या योजनेचा पत्ता लागत नाही. त्यामुळे ती त्यांच्या जाळ्यात ओढली जाते. ज्यामुळे अव्दैतला रूपालीचं खरं रूप कळतं.

नेत्रा इंद्राणी आणि शेखर नेमकी कोणती योजना आखतात? अव्दैतला रूपालीचं सत्य कसं समजणार? अव्दैत त्यावर विश्वास ठेवणार का तसेच विरोचक म्हणून रूपाली तिने केलेल्या गुन्ह्यांचं टोक गाठणार का?

यासाठी पाहायला विसरू नका महारविवार २४ डिसेंबर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading