हिरे हायस्कूल मध्ये पुण्यातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स लायब्ररी
पुणे : महाराष्ट्रातील व पुण्यातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बुक लायब्ररी आणि इ लायब्ररी कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल मध्ये तयार करण्यात आली आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स लायब्ररीचे उद्घाटन शाळेतील विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आदर्श मित्र मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंड यांच्या संयुक्त विद्यमाने ही लायब्ररी तयार करण्यात आली आहे. (Pune’s first Artificial Intelligence Library in Heere High School)
उदय जगताप म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होत आहे. याची माहिती शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही होणे गरजेचे आहे.जगातील चालू घडामोडी विद्यार्थ्यांना माहीत असायला हव्यात. यासाठी या लायब्ररीची सुरुवात करण्यात आली.
