Friday, November 20, 2026
BusinessLatest News

ब्लॅक फ्रायडे सायबर मंडे (BFCM) २०२३ शॉपिंग इव्हेंट दरम्यान Amazon ग्लोबल सेलिंगवर भारतीय निर्यातदारांनी अनुभवली 80% पेक्षा जास्त व्यवसाय वाढ

बेंगळुरू : 17-27 नोव्हेंबर दरम्यान जागतिक स्तरावर आयोजित ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे (BFCM) शॉपिंग इव्हेंट दरम्यान, Amazon Global Selling वर भारतीय निर्यातदारांनी नेहमीच्या व्यवसायाच्या तुलनेत 80% जास्त वाढ पाहिली. गेल्या वर्षी हाच शॉपिंग इव्हेंट (२० ऑक्टोबर पासून सुरू झाला.) यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 25% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली. सणासुदीच्या हंगामानंतर भारतात BFCM हा भारतीय निर्यातदारांसाठी महत्त्वाचा विक्री कालावधी आहे. BFCM’23 शॉपिंग इव्हेंटने Amazon ग्लोबल सेलिंगवर हजारो निर्यातदारांच्या व्यवसायात वाढ केली आहे. या कालावधीत टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील निर्यातदारांना वर्षभरात चांगलाच फायदा झाला. – करूर (गेल्या वर्षीच्या तुलनेत 100% पेक्षा जास्त), जुनागढ (गेल्या वर्षीच्या तुलनेत 100% ), इरोड (गेल्या वर्षीच्या तुलनेत 50% पेक्षा जास्त), जयपूर (गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% पेक्षा जास्त).

भारतीय उत्पादनांना चांगलीच मागणी

जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांनी 11 दिवसांच्या विक्री कालावधीत Amazon Global Selling वर भारतीय निर्यातदारांकडून खरेदी केली. यात उत्तर अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेतील ग्राहकांची संख्या जास्त होती. सौंदर्य (गेल्या वर्षीच्या तुलनेत 80% पेक्षा जास्त), आरोग्य आणि वैयक्तिक काळजी (गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 50%), किराणा (गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% पेक्षा जास्त), घर (गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ 30%), आणि स्वयंपाकघर (गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 30%) या श्रेणींमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. CGK Unlimited, Lane Linen, Kitsch, Skillmatics, California Design Den, आणि Gurunanda यासह इतर हजारो ब्रँड्ससह आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री करणार्‍या लोकप्रिय भारतीय ब्रँड्सना BFCM 2023 मध्ये जास्त मागणी होती.

भूपेन वाकणकर, डायरेक्टर, ग्लोबल ट्रेड, Amazon India, म्हणाले: “Amazon वरील जागतिक शॉपिंग इव्हेंटमध्ये भारतीय निर्यातदारांचे निरंतर यश पाहून आम्ही अत्यंत आनंदी आहोत. भारतीय उद्योजकांमध्ये ईकॉमर्स निर्यात आणि अमेझॉन ग्लोबल सेलिंगच्या वाढत्या मागणीचा हा एक पुरावा आहे. जगभरातील ग्राहकांना पुरविण्यासाठी Amazon च्या लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांचा लाभ घेण्यासाठी भारतातील सर्व व्यवसाय सक्षम करण्यावर आमचा भर आहे. 2025 पर्यंत भारतातून $20 अब्ज डॉलर्सची एकत्रित निर्यात सक्षम करण्याच्या आमच्या ध्येयानुसार आम्ही काम करतो आहोत. अशा प्रकारे ‘मेड इन इंडिया’ उत्पादने जागतिक पातळीवर नेण्यात आम्ही देखील खारीचा वाटा उचलतो आहोत.”

हेमंत पिशारोडी, बिझनेस हेड, होमस्पन ग्लोबल म्हणाले, “यंदा आम्ही BFCM’23 मध्ये अत्यंत उत्तम परफॉर्म केले. या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत व्यवसाय तिपटीने वाढला आहे. या वर्षी या इव्हेंटसाठी आम्ही चार महिने आधीच तयारीला लागलो. आणि आमच्या प्रयत्नांना उत्तम यश मिळाले. Amazon वरील हे पीक शॉपिंग इव्हेंट आम्हाला आमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी योग्य संधी तर देतातच पण आम्हाला ग्राहकांच्या गरज, आवडी आणि आमच्याबद्दलचे मत देखील कळते. Amazon Global Selling हा सुट्टीच्या हंगामात आमच्या ब्रँडसाठी एक अप्रतिम भागीदार आहे आणि आम्ही 2024 मधील अशा इव्हेंटसाठी खूप उत्सुक आहोत.”

 

भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत यशस्वी होण्यास मदत:

अधिक व्यवसायांना ई-कॉमर्स निर्यातीचा फायदा घेण्यासाठी आणि सुट्टीच्या काळात जागतिक स्तरावर विक्री करण्यास सक्षम करण्यासाठी, Amazon ने अलीकडेच SEND हा Amazon ची भागीदारी असलेला उपक्रम राबवला. भारतीय निर्यातदारांसाठी आंतरराष्ट्रीय शिपिंग सुलभ व्हावे यासाठी हा उपक्रम आहे. शेकडो भारतीय निर्यातदारांनी या सणासुदीच्या हंगामात त्यांची उत्पादने पाठवण्यासाठी SEND चा फायदा घेतला. अमेझॉनने पहिल्या तीन महिन्यांसाठी अमेझॉन ग्लोबल सेलिंग प्रोग्राममध्ये सहभागी होणाऱ्या नवीन भारतीय निर्यातदारांसाठी सदस्यता शुल्क $120 ($39.99 प्रति महिना) वरून फक्त $1 केले आहे. शिपिंग सोल्यूशन्ससह कार्यक्रमात भारतीय निर्यातदारांना समर्थन देण्याव्यतिरिक्त, Amazon ने भारतीय निर्यातदारांना प्रमुख खरेदी ट्रेंडची शिफारस केली ज्यामुळे त्यांना इन्व्हेंटरी तयार करणे आणि संबंधित उत्पादनांचे वर्गीकरण आणणे शक्य झाले. त्यासोबतच डील आणि जाहिरातींसाठी अनेक पर्याय देखील दिले.

SEND सह त्यांच्या अनुभवावर विक्रेते काय म्हणतात:

“आम्ही SEND Ocean Shipping सेवा वापरत आहोत. यांचे दर देखील वाजवी आहेत. आणि अत्यंत वेगात उत्पादने आमच्यापर्यंत पोहोचतात. इतरांच्या ६० दिवसांच्या तुलनेत SEND कडून ३० ते ३५ दिवसात आम्हाला उत्पादने मिळतात. SEND द्वारे उत्कृष्ट शिपिंग सेवा प्रदान करण्याच्या Amazon च्या वचनबद्धतेची आम्ही प्रशंसा करतो आणि आम्ही भविष्यात यशस्वी कार्य संबंधांची अपेक्षा करतो,” कॉटिंग्टनचे सह-संस्थापक कृष्णा मुरारी म्हणतात.

Leave a Reply