Monday, August 31, 2026
Latest NewsMAHARASHTRASports

हरियाणा स्टीलर्सचा पुणेरी पलटणवर विजय

पुणे : दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत घराच्या मैदानावरील चाहत्यांचा पाठिंबा असतानाही पुणेरी पलटण संघाला हरियाणा स्टीलर्स विरुध्द चित्तथरारक लढतीत 39-44 असा पराभव पत्करावा लागला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत आक्रमक विनयचे 15 गुण आणि बचाव पटू राहुल सेतपाल आणि जयदीप दहिया यांच्या 10 गुणांमुळे हरियाणा संघाने आश्चर्यकारक विजयाची नोंद केली.
पहिल्या मिनिटाला अस्लम इनामदारने पुणेरी पलटणला आघाडी मिळवून दिल्यावर विनयने पाच खेळाडू बाद केल्यामुळे पुणेरी पलटणवर लोन चढवून हरियाणा संघाने 11-7 अशी आघाडी मिळवली.
या पिछाडी नंतरही पुणेरी पलटण संघाने जोरदार झूंज देत ही पिछाडी मोडून काढली. राहुल सेतपालच्या चार पकडींमुळे हरियाणा ने आपली झुंज कायम राखली असली तरी पुणेरी पलटणच्या चढाईपटुंनी एका मागून एक गुण मिळवताना आपल्या संघाला पुनरागमन करून दिले.
पुणेरी पलटण संघाने त्याची परतफेड करताना 21-18 अशी मध्यंतराला. आघाडी मिळवली. उत्तरार्धात हरियाणा स्टीलर्सच्या बचाव पटूनी उत्कृष्ट पकडी करताना 9 गुण मिळवून पुणेरी पलटण चे आक्रमण निष्रप्रभ ठरविले. केवळ दोन मिनिटे बाकी असताना पिछाडीवर असलेल्या हरियाणा संघाने पुणेरी पलटण वर लोन चढवून अखेर 44-39 अशी बाजी मारली.
या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस वाहिनीवरून करण्यात येत असून डिजने हॉट स्टार संकेत स्थळावरूनही हे सामने विनामूल्य पाहता येत आहेत.
उद्याचे शनिवारी , 16 डिसेंबर रोजीचे सामने
पुणेरी पलटण विरुध्द बंगाल वॉरियर्स 8वजाता
तेलगू टायटन्स विरुध्द दबंग दिल्ली 9 वाजता

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading