ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते, टाटा कर्करोग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Veteran actor Ravindra Berde passed away)
रवींद्र बेर्डे यांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते.
वयाच्या विसाव्या वर्षी नभोवाणीशी आणि 1965 च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली. चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक,ह माल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, यांसारख्या 300 हून अधिक मराठी चित्रपट आणि जवळपास पाच हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केलं आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली आहे.
