लक्ष्मणराव आपटे प्रशालेत प्रतिकारशक्ती वाढीसाठी विशेष सत्र
पुणे : , हिवाळ्यात सामान्यत: तापमान आणि बदलत्या हवामानामुळे माणसाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे आजार होतात. बदलणारे हवामान, सामान्य जीवाणू आणि विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती कशी निर्माण करण्याची याबाबत आपटे रोड पुणे येथील लक्ष्मणराव आपटे प्रशालेत विद्यार्थ्यांना प्रतिकारशक्ती वाढी बाबत मार्गनदर्शन करण्यासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाबर च्यवनप्राशचे डॉ. परमेशवर अरोरा यांनी दिलेले काही सल्ले विद्यार्थ्यांना देण्यात आले. हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी मुलांमध्ये जागृती निर्माण करणे हा या सत्राचा उद्देश होता. .ह्या वेळी शाळेच्या प्राचार्य सौ. मेधा सिन्नरकर आणि इतर शिक्षकवृंद,गौतम मगर, मानसी गोणेकर, कविता शिंदे, अमिता आइकर, सैय्यद जस्मिन, दत्तात्रय चौगुले, कविता सूर्यवंशी, दिनेश कुमार मॅनेजर कॉर्पोरेट कम्युनिकेशन, डाबर इंडिया लि.उपस्थित होते.
