Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

NIA ची पुण्यात कारवाई; तीन जणांना घेतले ताब्यात

पुणे– दहशतवादी कट रचल्याच्या संशयावरून ( Pune) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयएने ) आज शनिवारी पहाटेपासून देशभरासह 44 जागांवर छापे टाकले आहेत.  पुण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक बातमी आहे. पुण्यातील कोंढवा भागातील तालाब मशीद परिसरात पहाटे कारवाई झाली असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर देशभरात तब्बल अडीच हजारांहून अधिक जणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या छापेमारीत इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर शेकडो जणांची चौकशी सुरू आहे.  ताब्यात घेण्यात आलेल्यांमधे पुण्यातील तिघांचा समावेश आहे.  या तिघांपैकी एकजण पुण्यातील कोंढवा भागातील तालाब मस्जीद परिसरात राहणारा आहे तर दोघेजण मोमिनपुरा भागात राहणारे आहेत.

Leave a Reply