Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

देविका वेंकटसुब्रमणियन यांच्या भरतनाट्यम ने जिंकली मने!

 

पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत देविका वेंकटसुब्रमणियन (मुंबई)यांच्या एकल भरतनाट्यम नृत्य सादरीकरणाला शनीवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. पारंपरिक भरतनाट्यम मार्गम आणि रामायणातील उर्मिला या विषयावर नव्या नृत्यरचना त्यांनी सादर केल्या . पुणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम शनीवार, ९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १९७ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading