Saturday, June 13, 2026
Latest NewsLIFESTYLE

‘इन सी’ या नृत्यदिग्दर्शन आणि नृत्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : पुण्यातील ग्योथं-इन्स्टिट्यूट – मॅक्स म्यूलर भवन आणि सेंटर ऑफ कंटेंम्परी डान्सचे संस्थापक ऋषिकेश पवार यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ८ डिसेंबर ते रविवार दि. १० डिसेंबर दरम्यान बर्लिन येथील सुप्रसिद्ध साशा वॉल्टस् अँड गेस्टस् या नृत्यसंस्थेची गौरवशील ३० पूर्ण झाल्यानिमित्ताने ‘इन सी- पुणे’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान एरंडवणे येथील द बॉक्स आणि शिवाजीनगर कृषी महाविद्यालया जवळील हातकागद संस्था या दोन्ही ठिकाणी कार्यक्रम होतील. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. मात्र यासाठीही आगावू नोंदणी करणे गरजेचे असल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

https://www.goethe.de/ins/in/en/sta/pun/current-projects-/in-c-in-pune.html#i9641015 कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व आगावू नोंदणी करण्यासाठी सदर लिंकचा वापर इच्छुकांना करता येईल.

नृत्याला भाषा नसते असे म्हणतात मात्र भावनेचे प्रकटीकरण करताना नृत्य हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. विविध समुदायांनी नृत्याच्या माध्यमातून एकत्र यावे आणि पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावेत ही संकल्पना साशा वॉल्ट्ज आणि कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे ते हृषिकेश पवार यांच्या मनात होती. त्यामुळे

या कार्यक्रमाद्वारे आत्मनिरीक्षण आणि अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत असे, आयोजकांच्या वतीने कळविण्यात आली आहे.

इन सी – पुणे कार्यक्रमा अंतर्गत मार्च २०२१ मध्ये प्रीमियर करण्यात आलेली टेरी रिलेच्या क्रांतिकारी रचनेपासून प्रेरित, आणि साशा वॉल्टस् अँड गेस्टस् द्वारे नृत्यदिग्दर्शित सामुहिक प्रस्तुतीकरण होईल याबरोबरच या प्रकल्पाअंतर्गत दररोज विविध कार्यक्रम संपन्न होतील. ८ डिसेंबर रोजी ‘आर्टिस्ट इन रेसिडेन्स’ हा कार्यक्रम द बॉक्स येथे सायं ७ वाजता होईल. या अंतर्गत अमृतवाहिनीच्या एनआयडीओ इंटरनॅशनल स्कूलमधील १२ ते १५ वयोगटातील विद्यार्थी कलात्मक कौशल्यांच्या विकासाला चालना देण्याच्या हेतून २ आठवड्यांचा ‘आर्टिस्ट इन रेसिडेन्स’चा अनुभव घेतील.

शनिवार दि ९ आणि रविवार दि १० डिसेंबर रोजी सायं ७ वाजता एरंडवणे येथील द बॉक्स या ठिकाणी दहा कलाकार कलात्मक सादरीकरण करतील. नृत्यासोबतच दृश्य संयोजनाचा अनुभव यावेळी उपस्थितांना घेता येईल.

रविवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाजवळील हातकागद संस्थेच्या आवारात ‘डान्स फॉर पार्कीसन्स’ हा कार्यक्रम संपन्न होईल. यावेळी ज्येष्ठ नागरिक अनुभवी कलाकारांसोबत नृत्याचा आनंद घेऊ शकतील. यानंतर सकाळी ११ वाजता हातकागद संस्थेच्या आवारात नृत्यदिग्दर्शासंदर्भात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. यासोबतच रसिकांना हातकागद संस्थेत साशा वॉल्टस् अँड गेस्टस् च्या ३० वर्षीय गौरवशाली प्रवासाचा चित्रात्मक आढावा घेता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading