Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न 

 पुणे: क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत क्रीडा अधिकारी कार्यालय ,जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय पुणे , पूना कॉलेज ऑफ आर्टस  सायन्स  अँड कॉमर्स व राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सव आजम कॅम्पस मध्ये संपन्न झाला.

युवा महोत्सवाचे उद्घाटन अभिनेता बिपिन सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी  पूना कॉलेजचे प्राचार्य व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ. आफताब अन्वर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, सहाय्यक क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार,  कृषी अधिकारी राजेंद्र डुंबरे, अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल बलवंत, प्राचार्या रोशन शेख, शैलेश मेहता,  क्रीडा विभागाचे विभागीय उपसंचालक अनिल चोरमुले, उपप्राचार्य इम्तियाज आगा, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते ताहीर, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते हितेश सोमानी, कुस्ती मार्गदर्शक शिवाजी कोळी  उपस्थित होते.
समूह लोकनृत्यात सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील लॉ कॉलेज खेड, विद्या प्रतिष्ठान बजाज अभियांत्रिक कॉलेज बारामती, पुना कॉलेज यांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकावले. तर वैयक्तिक लोकनृत्यात विद्या प्रतिष्ठान बारामतीची मानसी भोसले प्रथम, पुना कॉलेजची  दिशा राजपुरोहित हिने द्वितीय आणि  मेहक सिंग हिने तृतीय क्रमांक पटकावला. समूह लोकगीतात बारामतीच्या शारदा संगीत विद्यालयाच्या सुदर्शन बनसोडे ग्रुप यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वैयक्तिक लोकगीत स्पर्धेत सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील लॉ कॉलेजच्या स्वरांजली आस्वार हिने प्रथम तर शारदा संगीत विद्यालयाच्या साक्षी यादव हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
कथालेखन स्पर्धेत एमसीई सोसायटी आझम कॅम्पसच्या सायमा शेख हिने प्रथम, विद्याप्रतिष्ठान अभियांत्रिकीच्या श्रेया भोसले हीने द्वितीय तर  एमसीई सोसायटीच्या झोया मुल्ला हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत आबासाहेब गरवारे कॉलेजच्या मारुती इबितवार हा प्रथम पुन्हा कॉलेजच्या अमन आफताब याने द्वितीय तर  एमसीई  सोसायटीच्या मेहेक मकसूद ही तृतीय क्रमांकाची विजेती ठरली. पोस्टर्स स्पर्धेत अभिनव कला महाविद्यालयाच्या रक्शंदा काठवडे, ईशा वाकीकर, कल्याणी वावळ यांनी प्रथम तीन क्रमांक पटकाविले.
इतर निकाल – फोटोग्राफी १) अनुराग इंगळे, अभिनव कला महाविद्यालय २) सतीश टिळक, विद्या प्रतिष्ठान बारामती ३) अविनाश जाधव, अभिनव कला महाविद्यालय पुणे.

रांगोळी – १) फातिमा युसुफ नगरवाला अँड ग्रुप, पुना कॉलेज २) मेहेक सिंग शिवनी पासवान अँड ग्रुप, पूना कॉलेज ३) सिद्रा शेख प्रियंका वलदिया, पूना कॉलेज

मेहंदी –  १) अत्तरा वासीम २) आयेशा शेख ३)अल्फिया पठाण  सर्व पुना कॉलेज

मिलेट्स फ्रेश – १) साक्षी लोंढे व इतर ग्रुप २) क्षितिज मुद्रा लूथरा, भारती विद्यापीठ ३)पूजा लाहोटी व इतर ग्रोव्हलथी फूडस ४) किरण कापरे व इतर

मिलेट्स रेसिपी फूड पॅकिंग – १)  ज्ञानदीप हरिदास फडतरे व इतर,डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय पुणे २) गोविंद लाहोटी व इतर, ग्रोव्हलथी फूडस ३) गायत्री मुंडे व ऋतुजा विश्वासराव, ऍग्रो जी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड ४) जयश्री कुलकर्णी व इतर

युवाकृती ऍग्रो प्रॉडक्ट १) गुरुदत्त रामकृष्ण बोराडे, सर सेनापती हंबीरराव मोहिते विधि महाविद्यालय राजगुरुनगर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading