Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन

पुणे : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित, मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, धानोरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विद्या पाटील होत्या. प्रमुख पाहुणे सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून झाली व नंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी विजय श्रीवास्तव, योगेश बिंदगे, मारुती पाटील, विशाल वाघमारे, अंबादास कांबळे, गौतम बोरकडे, मुकेश विधाते, मनीषा चिंचणे, अनामिका कुलकर्णी, शुभांगी काळगुडे, तृप्ती कांबळे, प्रिया शेलार, ममता चौधरी, रुपाली पवार, तेजस्विनी देशमुख, रमाताई डंबारे, मानसी पलांडे, शीतल गायकवाड, अर्चना बनछोड, सविता इमडे, ज्योती एडके, सुरेखा टाकळे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेचा विचार फक्त लिहिला नाही, तर तो विचार ते जन्मभर जगले. ते खऱ्या अर्थाने कर्ते सुधारक होते. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी सहजपणे समानतेचे धडे दिले, असे अशोक पाटील यांनी सांगितले.
सूत्रसंचालन मारुती पाटील, प्रास्ताविक तृप्ती कांबळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला विजय श्रीवास्तव यांनी उजाळा दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading