Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

मुख्तियार अली यांनी रंगवली संगीताची अविस्मरणीय मैफिल 

 

पुणे : संगीत कोणत्याही प्रकारचं असो, ते लोकांना जोडण्याचं काम करतं. मात्र, सूफीसारख्या लोकसंगीताचं वैशिष्ट्य म्हणजे लोकांची मनं जोडणं, यावर भर दिला असतो. आपल्या गाण्यातून, संगीतातून लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमाची, आत्मीयतेची भावना कशी निर्माण होईल, याची शिकवण आम्हाला दिली जाते. संतांनी आपल्याला हेच शिकवलं आहे आणि तेच संगीताच्या माध्यमातून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काही शतकांची परंपरा असलेल्या सूफी संगीताचं अनेकांना आकर्षण आहे. हिंदी चित्रपटांमध्येही या संगीताचा, गाण्यांचा खुबीनं वापर केलेला आहे. परंपरा जपण्यातच खरा आनंद असतो. आपण सर्व एक आहोत, हीच शिकवण या संतांनी दिली आहे. परंपरेनं मला दिलं आहे, ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकलो, तरच समाधान वाटेल.

 ‘तूने क्या कर डाला, मर गई मैं’, ‘मेरा पिया घर आया’ ‘दमादम मस्त कलंदर’ हे सदाबहार गीत,प्रसिद्ध गायक मुख्तियार अली यांची मैफील उत्तरोत्तर रंगत गेली. सुफी अन् पारंपरिक संगीताच्या सुरावटींनी आणि श्रोत्यांच्या टाळ्यांच्या गजरात सजलेली ही मैफील अविस्मरणीय ठरली. अली यांनी मैफलीची सांगता केल्यानंतर ‘माहोल बना दिया’ अशीच भावना प्रत्येक श्रोत्याच्या मनात उमटली.

‘ सुहाना प्रस्तुत स्वास्थ्यम्’च्या समारोपाच्या दिवशी मुख्तियार अली यांची मैफील रंगली. अली यांनी ‘सजना तेरे बिना’ या रचनेला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. ‘तूने क्या कर डाला, मर गई मैं’ आणि ‘मेरा पिया घर आया’ ही गीते त्यांनी आगळ्यावेगळ्या ढंगात सादर केली.

राकेश कुमार यांनी ढोलकी , अमित दत्त चौबे यांनी तबला , भगवान दास यांनी संवादिनीवर आणि फारुक अब्दुल लतीफ खान यांनी सारंगीवर साथसंगत केली. अली यांचे पुत्र वकार युनूस यांनी सहगायक म्हणून समर्पक साथ दिली

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading