भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी प्रकाश बाफना
पुणे : भारतीय जनता पक्षांतर्गत येत असलेल्या व्यापारी आघाडी प्रदेश चिटणीस प्रकाश एस.बाफना यांची प्रदेशाधयक्ष चंद्रशेखर बावकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणी च्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती केली आहे. याबाबतचे पत्र नुकतेच बाफना यांना देण्यात आले आहे. पुणे शहरातील जुने आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या बाफना यांची कसबा मतदार संघात सक्रिय अशी ओळख आहे. पुणे शहर व्यापारी आघाडी, प्रदेश चिटणीस अश्या विविध पदांवर यांनी काम पाहिले असून संघटनात्मक पातळ्यांवरही त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. ह्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ह्यांनी बाफना यांची प्रदेश कार्यकारिणी च्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती केली आहे. भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाफना यांनी ह्या नियुक्ती नंतर सांगितले.
