Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

लग्जरी हाउसिंग प्रोजेक्ट्स “डिवाइन गार्डन” मध्ये खरेदी करा स्वप्नातले घर

 

पुणे, : घर खरेदी म्हणजे फक्त चार भिंतींच्या आत बंदिस्त झालेली जागा खरेदी करणे एवढेच नसते. विशेषत: श्रीराम असोसिएट्सच्या प्रकल्पात घर घेणारे ग्राहक एक स्टायलिश आणि खास अनुभव खरेदी करत असतो. श्रीराम असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राकेश अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रोहन अगरवाल, रूचिका अग्रवाल उपस्थित होते.
पुढे राकेश अगरवाल म्हणाले, आम्ही पुण्याच्या लोहगाव परिसरात आमचा अत्याधुनिक लग्जरी हाउसिंग प्रोजेक्ट्स “डिवाइन गार्डन” घेऊन आलो आहोत ते ग्राहकांना घर खरेदी चा निर्णय एखाद्या समारंभा सारखा साजरा करता यावा ही इच्छा घेऊन! आमचे हजारो ग्राहक श्रीराम असोसिएट्स च्या प्रकल्पांना सर्वोच्च पसंती देतात. आता आम्ही पुण्याच्या नव्या युगाच्या ग्राहकांसाठी आमचा “डिवाइन गार्डन” हा गृहप्रकल्प घेऊन आलो आहोत. त्यांच्यासाठी आधुनिक सुखसोयींनी सज्ज असे घर खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.
श्रीराम असोसिएट्स ने गेल्या 23 वर्षांच्या आपल्या वाटचालीत ग्राहकांचा विश्‍वास संपादित केला आहे.  राकेश अगरवाल म्हणाले की 1500 हून जास्त समाधानी परिवारांच्या आशीर्वादाने आम्ही 1 लाख 24 हजार चौरस फूट जागा नंदनवना सारखी विकसित केली आहे. आजघडीला श्रीराम असोसिएट्स 51 लाख चौरस फूट आकाराचे प्रकलप विकसित करत आहे, असे श्री राकेश अगरवाल म्हणाले. अगरवाल म्हणाले की पुण्यासारख्या हॅपी आणि हापनिंग शहरात उभा राहणार असलेल्या “डिवाइन गार्डन” प्रकल्पाची एक खासियत म्हणजे विमानतळ हाकेच्या अंतरावर असणे. प्रकल्पात 2 बेडरूम आणि 3 बेडरूमचे फ्लॅट उपलब्ध आहेत. 12 एकर प्रशस्त जागेत 20 टॉवर, 10 सुविधा पार्क आणि 108 सार्वजनिक वापराच्या सोयीची व्यवस्था असेल. रुचिका अगरवाल या मान्यवर रुरो डिझाइन स्टुडिओ च्या आर्किटेक्ट ने डिव्हाइन गार्डन ची संपूर्ण वास्तुरचना केली आहे.

श्रीराम असोसिएट्सचे  रोहन अगरवाल म्हणाले की आधुनिक, आरामशीर , उत्तम सजावटीचे स्टायलिश फ्लॅट हे इतरांना फक्त घर वाटतील पण आमच्या ग्राहकांसाठी तो एक आनंदाचा ठेवा असेल. विमानतळापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या “डिवाइन गार्डन” मध्येे गृह योजनेसाठी आवश्यक अशी सर्व वैशिष्ट्ये आहेत. ही यादी लांबलचक आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज आणि शॉपिंग सेंटर हे सर्व अगदी नाजिक, 4 वेगवेगळे स्विमिंग पूल, इनडोअर गेमिंग, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मिनी थिएटर, सेल्फी पॉइंट, लर्निग सेंटर, पाहुण्यांसाठी स्युइट्स, हॉबी स्पेस…या सर्व सुविधा सर्व वयोगटाच्या अपेक्षा लक्षात घेऊन नियोजित केल्या आहेत. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, स्पा, स्टीम रूम, फिटनेस डेक, आऊटडोअर जिम, अक्युप्रेशर हे सर्व उपलब्ध असेल. क्रिकेट, एअर हॉकी, गॉल्फ अशा क्रीडा सुविधा असतील. ग्राहकांना काही क्षण शांतपणे स्वतःच्या सांनिध्यात घालवता यावेत यासाठी विशेष स्थळे असतील.ग्राहकांना त्यांची कौटुंबिक फंक्शन आनंदाने साजरी करता यावी यासाठी लॉन असेल तसेच डेक, किचन, मंदिर, बरबेक्यू, सीट आउट आणि अंफी थिएटर सुद्धा असेल. नव्या युगातील ग्राहकांच्या खास सोयीसाठी डिव्हाइन गार्डन मधील फ्लॅट मध्ये वर्क फ्रॉम होम साठी खास जागा असेल. श्री अगरवाल म्हणाले की टेहळणी मनोरे, आणीबाणी प्रसंगी बाहेर पडायला सोयीचे दरवाजे, रॅम्प, स्ट्रीट लाइट, उच्च दर्जाचे अंतर्गत रस्ते, पदपथ आणि प आधारित सुरक्षा व्यवस्था तसेच व्हिडिओ डोअर फोन यांचाही विचार केलेला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading