Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

कीर्तनातून नाम भक्तीचा गजर !

 

पुणे: भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित ‘कथा कीर्तन महोत्सव’ मध्ये सहाव्या दिवशी शनीवार, दि. २ डिसेंबर रोजी ,सायंकाळी ६ वाजता नागपूर येथील ह .भ. प. मोहनबुवा कुबेर यांच्या पारंपरिक नारदीय कीर्तनाला चांगला प्रतिसाद मिळाला .

महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सवात हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नागलक्ष्मी राव, निवृत्त पोलिस सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, सिलाई वर्ल्डचे संचालक दादा गुजर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी सर्वांचे स्वागत केले.

मोहनबुवा कुबेर म्हणाले,’आत्म निवेदन मधून आत्मप्रचीती हा कीर्तनाचा हेतू आहे. कीर्तनाच्या मधून येणारे कथा कथन हे सिद्धांतासाठी आहे.हा कीर्तन महोत्सव त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे’. नारदीय आणि सांप्रदायिक कीर्तनाची वैशिष्ट्ये देखील त्यांनी सांगितली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading