कायदा सुव्यवस्थेची भीती बाळगू नका शौर्यदिन अभिवादन सोहळ्यासाठी सर्वोत्तम नियोजन
पुणे पोलिसांकडून बैठकीत विश्वास व्यक्त
पुणे : 1 जानेवारी 2024 रोजी भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यंदाच्या वर्षी सर्वोत्तम नियोजन करण्यात येणार असून राज्यातील अनुयायांनी कायदा सुव्यवस्थेबाबत कोणतीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. असे प्रतिपादन आपण पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे व रंजन कुमार शर्मा यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित आंबेडकरी पक्ष संघटना प्रतिनीधींच्या बैठकीत केले.
भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा शांततेत पार पाडावा यासह त्या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना देण्यात येणाऱ्या सुविधांविषयी आढावा घेण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात आज उत्सवाशी संबंधित पक्ष संघटना तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा , पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे , पोलीस उपायुक्त राजा , वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्विजयकुमार मगर, पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांच्यासह सहाय्य पोलीस आयुक्त सतिष गोवेकर , संजय पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर वरिष्ठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार उपस्थित होते. आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे , माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , बसपाचे किरण आल्हाट , रमेश गायकवाड , वंचित बहुजन आघाडीचे शहराद्ध्यक्ष मुनवर कुरैशी , अरविंद तायडे ,सचिन धिवार , माजी महापौर रजनी त्रिभुवन, सुवर्णा डंबाळे , स्नेहा माने , स्वाती गायकवाड , अर्चना केदारी, संजय आल्हाट , नागेश भोसले , सुनिता वाघमारे , यांसह पुणे शहरातील व जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते
अफवांना थारा न देता सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : राहुल डंबाळे
“ पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण बैठकांमुळे यंदाचे नियोजन हे सर्वोत्तम होईल याची खात्री वाटत आहे. तसेच राज्यातील आंबेडकरी अनुयायांनी कोणत्याही स्वरूपांच्या अफवांना थारा न देता तसेच पोलिसांनी केलेल्या अवाहना नुसार कायदा सुव्यवस्थेची कोणतीही भीती न बाळगता भीमा कोरेगाव शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी 31 डिसेंबर व एक जानेवारी साठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. “ असे आवाहन भीमा कोरेगाव शौर्य दिन समन्वय समितीचे राहुल डंबाळे यांनी यावेळी केले.
