वन व्यवस्थापनाकडे शास्त्र म्हणून पाहावे: महादेव मोहिते
पुणे : महाराष्ट्राच्या व्याघ्र प्रकल्पातील सर्वोत्कृष्ट गाईड’ हा पुरस्कार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर मधे काम करणाऱ्या शहनाज बेग यांना जीविधा संस्थेतर्फे माहिती उपसंचालक डॉ .राजू पाटोदकर, उपवसंरक्षक महादेव मोहिते, जीविधा संस्थेचे संस्थापक राजीव पंडीत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.वृंदा पंडीत, ओमकार बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शुक्रवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण कलादालन येथे हा कार्यक्रम झाला.
भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला’ पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वन्यजीव संवर्धनाच्या या यशस्वी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवाचे कौतुक करण्यासाठी ‘जीविधा’ संस्थेतर्फे आयोजित भित्तीपत्रक प्रदर्शनात हा पुरस्कार देण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह असे स्वरूप होते.
यावेळी बोलतांना डॉ.पाटोदकर म्हणाले, ‘वाघाची संख्या वाढत नेली पाहिजे. हे अवघड काम आहे.ते जतन केले पाहिजेत. वाघ दाखविण्याचे काम करणारे पर्यटक मार्गदर्शक हे काम महत्वपूर्ण आहे. या कामाला समजून घेतले पाहिजे. जनजागृती च्या कामात त्यांचा मोठा वाटा आहे.
महादेव मोहिते म्हणाले,’ एक वाघ जगविण्यासाठी 500 हरणे असणे, दोनशे एकर जंगल लागते. वन व्यवस्थापन त्यासाठी महत्वाचे असून त्या कडे शास्त्र म्हणून पाहिले पाहिजे. गवताळ प्रदेश जपले पाहिजेत. पुणे जिल्ह्यात लांडगे चांगले आहेत, तेही टिकणे आवश्यक आहे.
शहनाज बेग म्हणाल्या, ‘ ताडोबा भागातच जन्मल्या ने आणि वन खात्याची पार्श्वभूमी घराला असल्याने हे काम सोपे गेले.निसर्ग, जंगलावर प्रेम केले पाहिजे.गाईड होणे आव्हानात्मक आहे, ते पेलले पाहिजे. पर्यटक देखील खुप माहिती देतात. त्यातून आम्ही शिकत राहतो.
राजीव पंडीत म्हणाले,’ पर्यटक मार्गदर्शक हे पर्यटन क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. योग्य प्रशिक्षण, दृष्टिकोन आवश्यकच आहे. स्थानीक माणूस जगला तर प्राणी जगणार आहेत. निसर्ग संवर्धनात त्यांचे योगदान मोलाचे ठरते.
२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड, पुणे येथे ‘व्याघ्र प्रकल्पाची पन्नास सोनेरी वर्षे’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाद्वारे वाघांच्या संवर्धनात ‘ व्याघ्र प्रकल्पांची’ भुमिका , स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न, व्याघ्र प्रकल्पांसमोरील भावी काळातील आव्हाने यासारख्या विषयांची माहिती पोस्टरद्वारे करून दिली जात आहे.
