सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे उद्या उद्घाटन
“आदरणीय सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधान पदाचा त्याग केला. जनतेप्रती सेवाभाव ठेवून निष्ठेने कर्तव्य पार पाडत आहेत. याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २००४ सालपासून काँग्रेसच्या वतीने सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह साजरा करत आहोत. या सप्ताहात ससूनमधील शवागारात काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार, ‘मुठाई नदी काल, आज आणि उद्या’ या विषयावर खुला गट चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर, महाआरोग्य तपासणी शिबिर, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, अंध शाळा आदी ठिकाणी फळे, मिठाई, कपडे वाटप, तसेच पदपथावर राहणाऱ्यांना एक हजार ब्लँकेट वाटप, महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा, विशेष आरोग्य शिबिर, सफाई महिला कर्मचारी सत्कार आणि साड्या व आरोग्य कीट वाटप आदी उपक्रम आयोजिले आहेत. संविधान घर तयार करून त्यात प्रदर्शन भरविले जाईल. प्रियदर्शनी इंदिरा विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागात हे उपक्रम राबविले जाणार आहेत,” असेही मोहन जोशी यांनी नमूद केले.
