fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

युटीआय फ्लेक्सी कॅप फंड – व्यावसायिक शाश्वततेवर भर देणारा फ्लेक्सी- कॅप पोर्टफोलिओ

 १९९२ पासून संपत्ती निर्मितीची परंपरा

वास्तववादी आर्थिक ध्येय आखणे ही कोणत्याही गुंतवणुकदारासाठी यशस्वी गुंतवणुकीची पहिली पायरी असते. सातत्याने परतावे देणारा गुंतवणुकीचा पर्याय शोधणे महत्त्वाचे असले, तरी त्याच्याशी संबंधित जोखीम समजून घेणे हे दीर्घकाळ जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी गरजेचे आहे. लघुकालीन ते दीर्घकालीन आर्थिक ध्येये साध्य करण्यासाठी म्युच्युअल फंडांच्या पर्यायांचा शोध घेता येईल व असेट क्लासमधील विस्तृत प्रकारच्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक करता येतील. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य गुंतवणूक पर्यायाच्या शोधात असलेल्यांसाठी म्युच्युअल फंड उत्पादनाचा पुढील पर्याय योग्य आहे. फ्लेक्सी कॅप फंड्स ओपन एंडेड इक्विटी फंड्स असून किमान ६५ टक्के एकूण असेट्समध्ये गुंतवणूक करणारे हे फंड्स लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप फंड अशा वेगवेगळ्या बाजार भांडवलाच्या इक्विटी असेट्समध्ये गुंतवणूक करतात. युटीआय फ्लेक्सी कॅप फंड हा या विभागातील सर्वात जुन्या फंड्सपैकी (१९९२ पासून) एक असून त्याला दीर्घकालीन सातत्यपूर्ण कामगिरीचा इतिहास लाभलेला आहे. फंडाची एकूण रक्कम २४,३७० कोटी रुपये (३१ ऑक्टोबर २०२३ रोजी) आहे. युटीआय म्युच्युअल फंडाचा हा पर्याय दर्जेदार व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकदारांसाठी आर्थिक मूल्य तयार करणारा असून फंडाच्या शोधात असलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांसाठी योग्य आहे.

 

युटीआय फ्लेक्सी कॅप फंडाचे गुंतवणूक तत्व दर्जा, विकास आणि मूल्यांकन या तीन स्तंभांवर आधारित आहे. पोर्टफोलिओ धोरण दीर्घ काळात दमदार विकास करण्याची क्षमता असलेल्या व अनुभवी व्यवस्थापकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करणारे आहे.

 

‘दर्जा’ म्हणजे व्यवसायाची दीर्घकाळात हाय रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई) किंवा रिटर्न ऑन इक्विटी (आरओई) टिकवून ठेवण्याची क्षमता. खऱ्या अर्थाने दर्जेदार व्यवसाय कठीण काळातही आपल्या उद्योगात किंवा क्षेत्रात उच्च आरओसीईज आणि आरओईजची निर्मिती करतात व म्हणून कायम भांडवल खर्चाच्या वरती कामगिरी करतात. खूपदा उच्च आरओसीई/आरओई रोखीचा दमदार प्रवाह तयार करण्यास सक्षम असतात आणि रोखीचे हे दमदार प्रवाह आर्थिक मूल्य निर्मितीचा स्त्रोत ठरतात.

दुसरीकडे ‘विकास’ म्हणजे व्यवसायाची दीर्घकालीन निरपेक्ष वाढ. चक्राकार आणि अस्थिर विकासापेक्षा स्थिर आणि अपेक्षेनुसार विकासपथावर असलेल्या व्यवसायात गुंतवणूक करण्यावर फंडाद्वारे भर दिला जातो. चक्राकार विकास किंवा एकाच स्थितीत स्थिर राहिलेला विकास बेभरवशाचा असू शकतो, जो गुंतवणुकदारांना कोणत्याही दिशेने आश्चर्यचकित करू शकतो. दुसरीकडे निरपेक्ष विकास जास्त प्रमाणात निश्चित, दीर्घकालीन गुंतवणूक व पर्यायाने भविष्यकालीन परतावे जाणणारा असतो. उच्च दर्जाचे व्यवसाय आर्थिक मूल्याची निर्मिती करतात, तर उच्च विकास व्यवसाय आर्थिक मूल्याची चक्रवाढ शक्य करतात. याच कारणामुळे हा फंड दर्जा आणि विकासाचा सुवर्णमध्य साधत स्टॉक्सची निवड करतो.

 

या फंडाच्या गुंतवणूक तत्वाचा शेवटचा स्तंभ आहे, ‘मूल्यांकन’. मूल्यांकन हे चांगल्या व्यवसायात प्रवेश करण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. म्हणूनच एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. व्यवसायाचे मूल्यांकन समजून घेण्यासाठी प्राइस टु अर्निंग्ज (पी/ई) हा प्रवेश करण्यासाठी चांगला मुद्दा असला, तरी ते सर्वाधिक गैरसमज असलेल्या मूल्यांकन तंत्र आहे. पी/ई हे केवळ कंपनीच्या रोखीच्या प्रवाहाच्या निर्मितीचे व दीर्घकाळात मूल्य निर्मिती करण्याच्या क्षमतेचे लघुरूप आहे. खूपदा उच्च आरओसीई आणि उच्च विकास व्यवसाय दीर्घकाळात जास्त मूल्य निर्मिती करतात आणि म्हणून गणिती दृष्टीकोनातून त्यांना उच्च पी/ई आवश्यक असतो. व्यवसाय पुढील काही महिने किंवा तिमाहींदरम्यान कशाप्रकारची कामगिरी करेल यापेक्षा व्यवसायाची मूलभूत तत्वे लक्षात घेऊन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे व्यवसाय गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय असू शकतात. म्हणूनच केवळ पी/ई तपासून निष्कर्ष काढण्यापूर्वी प्रत्येक व्यवसायाची वैशिष्ट्ये तपासून त्यानंतर प्रत्येकासाठी योग्य मूल्यांकन श्रेणी ठरवणे योग्य ठरेल. पी/ई मधून कळणाऱ्या गोष्टींपेक्षा न उघड होणाऱ्या बाबी जास्त आहेत आणि त्याचा कायम आरओसीईच्या संदर्भात विचार करणे आवश्यक असते व ती व्यवसायात पुनर्गुंतवणूक करण्याची आणि रोखीचा मुक्त प्रवाह तयार करण्याची संधी आहे.

 

फंडाद्वारे गुंतवणुकीच्या ‘विकास’ तत्वाला अनुसरून वेगवेगळ्या बाजार भांडवलांमध्ये गुंतवणूक केली जाते. या योजनेच्या पहिल्या दहा होल्डिंगमद्ये एचडीएफसी लि., एलटीआयमाइंडट्री लि., बजाज फायनान्स लि., आयसीआयसीआय बँक लि., इन्फोसिस लि., अव्हेन्यू सुपरमार्ट्स लि., कोटक महिंद्रा बँक लि., इन्फो- एज (इंडिया) लि., टायटन कं. लि. आणि को- फोर्ज लि. यांचा समावेश असून ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांचा पोर्टफोलिओ रकमेत ४५ टक्के वाटा आहे.

 

युटीआय फ्लेक्सी कॅप फंड पूर्णतः इक्विटी पोर्टफोलिओ उभारण्यात रस असलेल्या आणि आर्थिक मूल्याची निर्मिती करणाऱ्या दर्जेदार व्यवसायात गुंतवणूक करून दीर्घ कालीन भांडवल विकास करू इच्छिणाऱ्या इक्विटी गुंतवणुकदारांसाठी योग्य आहे. मध्यम जोखीम स्वरूप असलेल्या आणि दीर्घकालीन आर्थिक ध्येय साकार करण्यासाठी किमान ५ ते ७ वर्षांची गुंतवणूक करण्याची तयारी असलेल्यांनी या फंडाचा विचार करावा.

 

Leave a Reply

%d