कॅम्पस अॅक्टिव्हवेयरची देशभरात २५० स्टोअर्स
कॅम्पस अॅक्टिव्हवेयरची देशभरात २५० स्टोअर्स – दर्जेदार फॅशन आणि ग्राहकाला पहिले प्राधान्य देण्याची परंपरा कायम
२०१७ पासून ब्रँडने आपल्या स्टोअर्सची संख्या ३५ वरून २५० वर नेत अल्पावधीत मोठा टप्पा पार केला आहे.
हा टप्पा साजरा करण्यासाठी ब्रँडने सीझन मॉल, पुणे येथे २५० वे स्टोअर सुरू करत दर्जेदार अॅक्टिव्हवेयर उपलब्ध करण्याची बांधिलकी जपली आहे.
कॅम्पस अॅक्टिव्हवेयरतर्फे खास ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष ऑफर्स – ४९९९+ रुपयांची खरेदी करा आणि मोफत वायरलेस इयरफोन किंवा ३४९९+ रुपयांची मोफत बॅगपॅक मिळवा.
नवी दिल्ली, ०० नोव्हेंबर २०२३ – कॅम्पस अॅक्टिव्हवेयर या भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स आणि अॅथलीझर फुटवेयर ब्रँडने विस्तार योजनेअंतर्गत देशभरात २५० स्टोअर्सचा टप्पा गाठल्याचे जाहीर केले. ही असामान्य कामगिरी साजरी करण्यासाठी कंपनीने पुण्यातील सीझन्स मॉल येथे नवे स्टोअर सुरू करत दर्जेदार, फॅशनेबल व वाजवी शूज ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपली आहे.
याप्रसंगी कॅम्पस अॅक्टिव्हवेयरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निखिल अगरवाल म्हणाले, ‘ग्राहकांच्या पसंतीबरोबर जुळवून घेत कॅम्पस अॅक्टिव्हवेयरने आपला विकास केला आहे. आज फॅशनच्या बदलत्या गरजा खऱ्या अर्थाने समजून घेणाऱ्या ब्रँडमध्ये आमचे रूपांतर झाले आहे. म्हणूनच आम्ही भारतातील सर्वात मोठ्या फुटवेयर ब्रँड्सपैकी एक आहोत, शिवाय सर्वात ट्रेंडी आणि फिट, सातत्याने नवीन शूज उपलब्ध करणारा, स्टोअर्स सुरू करणारा ब्रँड म्हणून आमची ओळख तयार झाली आहे. २५० वे स्टोअर सुरू करत असतानाच सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचे, प्रत्येकाला नवी स्टाइल, आत्मविश्वास व अभिव्यक्ती आपलीशी करण्यासाठी प्रेरणा देण्याचे आमचे ध्येय आहे. देशांतर्गत संशोधन आणि डिझाइनचे तत्व यांच्या आधारे आम्ही आजच्या तरुणांना त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाविषयी आत्मविश्वासपूर्ण वाटण्यासाठी मदत करत आहोत.’
२००५ मध्ये स्थापना झाल्यापासूनच ब्रँडने सातत्याने आपल्या उत्पादन श्रेणीत अत्याधुनिक डिझाइन्सचा समावेश केला आहे. ब्रँडने कायमच नाविन्य, धोरणात्मक भागिदारी आणि खास भागिदारींच्या माध्यमातून ग्राहकांच्या बदलत्य गरजा आपल्याशा केल्या आहेत. कॅम्पसचा रिटेल प्रवास २०१७ मध्ये सुरू झाला. २०२० मध्ये ब्रँडच्या एक्झक्लुसिव्ह आउटलेट्सची संख्या ३५ होती व आता देशभरातील दालनांची एकूण संख्या २५० वर गेली आहे. दमदार ऑनलाइन नेटवर्कच्या मदतीने कॅम्पसने सर्व प्लॅटफॉर्म्सवर आपले स्थान निर्माण केले आहे. हा विकास ब्रँडच्या दर्जेदार स्पोर्ट्स आणि अॅथलीझर वेयर वैविध्यपूर्ण ग्राहकांना पुरवण्याचा बांधिलकीशी सुसंगत आहे. आजवरच्या प्रवासात ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि निष्ठेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असे श्री. अगरवाल म्हणाले.
कॅम्पस अॅक्टिव्हवेयर कायमच नाविन्यपूर्ण फॅशन आणि आरामदायीपणाच्या बाबतीत आघाडीवर राहिले आहे. इतक्या वर्षांत कॅम्पसने गुणवत्तेशी बांधिलकी कायम राखत आपल्या फॅशन श्रेणीचा विकास केला आहे. चपळ, आधुनिक, ट्रेंडी डिझाइन्स, उठावदार रंग व आकर्षक किंमती यामुळे ब्रँडचे स्थान मजबूत झाले. जागतिक फॅशन ट्रेंड्सवर नजर ठेवत ब्रँडने बहुमाध्यमिक चॅनेल्सद्वारे विक्रीचा दृष्टीकोन अवलंबला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मागणी व ग्राहकांच्या विविध गरजा पुरवणे ब्रँडला शक्य झाले आहे.
या खास प्रसंगाच्या निमित्ताने कॅम्पिस अॅक्टिव्हवेयरने भारतातील विविध स्टोअर्समध्ये खास ऑफर्स लाँच केल्या आहेत. ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ब्रँडने ४९९९+ रुपयांची खरेदी करा आणि मोफत वायरलेस इयरफोन किंवा ३४९९+ रुपयांची मोफत बॅगपॅक मिळवा अशा ऑफर्सचा त्यात समावेश आहे.
संकेतस्थळाची लिंक: https://www.campusactivewear.com/
कॅम्पस अॅक्टिव्हवेयर भविष्यासाठी उत्सुक आहे. ग्राहकांचा स्टाइल कोशंट वाढवण्यासाठी, प्रत्येक प्रसंगांत त्यांना साथ देण्यासाठी व सातत्याने विकसित होत असलेल्या बाजारपेठेत असामान्य उत्पादने उपलब्ध करत वेगवेगळ्यांना पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी ब्रँड सज्ज आहे. २५० स्टोअर्समुळे कॅम्पस अॅक्टिव्हवेयर ग्राहकांच्या जास्त जवळ पोहोचले आहे. कॅम्पस अॅक्टिव्हवेयरने भारतातील सर्वाधिक पसंतीचा अॅथलीझर ब्रँड बनण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी नाविन्यपूर्ण डिझाइन्स व उत्पादने पुरवण्याची कंपनीची योजना आहे.