fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

टीबीओ टेक लि.ने नव्याने जारी करण्यात येणारे समभाग आणि इक्विटी शेयर्सच्या ओएफएससाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

डीआरएचपी लिंक:
https://www.axiscapital.co.in/wp-content/uploads/TBO-Tek-Limited-DRHP.pdf

टीबीओ टेक लिमिटेडने ४०० कोटी रुपयांचे नव्याने जारी करण्यात येणारे समभाग आणि १.५६ कोटी इक्विटी शेयर्सच्या ओएफएससाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

सर्वसमावेशक ट्रॅव्हल इन्व्हेन्टरीसह, १००पेक्षा जास्त देशांमधील खरेदीदार व पुरवठादारांना सेवा पुरवणारा, जागतिक पातळीवरील ट्रॅव्हल व टुरिजम उद्योगक्षेत्रातील एक आघाडीचा ट्रॅव्हल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म, टीबीओ टेक लिमिटेडने प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी समभागांच्या विक्रीतून भांडवल उभारणीसाठी आयपीओसाठी सेबीकडे ऑफर डॉक्युमेंट दाखल केले आहे. यामध्ये ४०० कोटी रुपयांपर्यंत नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा आणि १,५६,३५,९९६ पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीसाठीच्या ऑफरचा समावेश असणार आहे.

नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून जे भांडवल उभारले जाईल त्याचा वापर नवे खरेदीदार आणि पुरवठादार समाविष्ट करून, अज्ञात इनऑरगॅनिक अधिग्रहणे करून प्लॅटफॉर्मची वृद्धी व बळकटीकरण करण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी केला जाईल.

३० जून २०२३ रोजीच्या आकडेवारीनुसार, टीबीओ प्लॅटफॉर्मवर १ मिलियनपेक्षा जास्त पुरवठादारांसह, १०० पेक्षा जास्त देशांमधील १४७००० पेक्षा जास्त खरेदीदारांना एकत्र जोडण्यात आले आहे. टीबीओवर ७५०० पेक्षा जास्त डेस्टिनेशन्स उपलब्ध आहेत आणि त्यांच्या प्लॅटफॉर्ममार्फत दर दिवशी ३३००० बुकिंग्स केली जातात. टीबीओवर फोरेक्स असिस्टन्ससह ५५ पेक्षा जास्त चलने चालतात. (स्रोत: वनलॅटिस रिपोर्ट) हॉटेल्स, एअरलाईन्स, कार रेंटल्स, ट्रान्स्फर्स, क्रुजेस, विमा, रेल आणि इतर पुरवठादारांसाठी तसेच ट्रॅव्हल एजन्सीज आणि स्वतंत्र ट्रॅव्हल अड्वायजर्स यासारखे रिटेल खरेदीदार व टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल मॅनेजमेंट कंपन्या, ऑनलाईन ट्रॅव्हल कंपन्या, सुपर ऍप्स व लॉयल्टी ऍप्स यासारखे एंटरप्राइज खरेदीदार यांच्यासाठी, टीबीओ पुरवठादार व खरेदीदारांना एकमेकांसोबत सहजपणे व्यवहार करण्यात सक्षम करणाऱ्या दुतर्फा टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्ममार्फत, ट्रॅव्हलचा व्यवसाय करणे सहजसोपे बनवते. टीबीओच्या प्लॅटफॉर्मवर विविध पुरवठादारांचा खूप मोठा बेस आहे जे इन्व्हेन्टरी प्रदर्शित व मार्केट करू शकतात, किमती निश्चित करू शकतात आणि खूप मोठ्या, विविध खरेदीदारांच्या जागतिक बेसपर्यंत पोहोचू शकतात. खरेदीदारांसाठी हा प्लॅटफॉर्म एकीकृत, विविध चलने चालणारे आणि अनेक भाषांमध्ये काम करणारे वन-स्टॉप सोल्युशन बनला आहे, जो त्यांना आराम, कॉर्पोरेट कामे आणि धार्मिक अशा विविध ट्रॅव्हल विभागांमध्ये जगभरातील डेस्टिनेशन्ससाठी ट्रॅव्हल शोधण्यात आणि बुक करण्यात मदत करते.

१,५६,३५,९९६ पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्री ऑफरमध्ये गौरव भटनागर यांच्याकडून २०,३३,९४४ पर्यंत; मनीष धिंग्रा यांच्याकडून ५,७२,०५६ पर्यंत; एलएपी ट्रॅव्हलकडून २६,०६,००० पर्यंत (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर) आणि टीबीओ कोरियाकडून ३७,६७,२०० पर्यंत; ऑगस्ता टीबीओकडून ६६,५६,७९६ पर्यंत (समभाग विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार) इक्विटी समभागांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये टीबीओचे एकूण उत्पन्न १०८५.७७ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ३४७.८८ कोटी रुपये इतके वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न ५११.९३ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १७६.५५ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये त्यांचा रिस्टेटेड नफा १४८.४९ कोटी रुपये व आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ४७.३ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये हा नफा ३३.७२ कोटी रुपये व आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ३४.१४ कोटी रुपयांचे नुकसान नोंदवण्यात आले होते.
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये समायोजित ईबीआयटीडीए मार्जिन १८.६९% व आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत २०.०३% होते.

कंपनी व समभाग विक्री करू इच्छिणारे समभागधारक, बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने, कंपनीच्या निर्णयानुसार, रोख मोबदल्यासाठी इक्विटी शेअर्सचा खाजगी प्लेसमेंट किंवा लागू कायद्यानुसार परवानगी असलेल्या अन्य मार्गाचा विचार करू शकतात. (प्री-आयपीओ प्लेसमेंट) आरओसीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करण्यापूर्वी प्री-आयपीओ प्लेसमेंट हाती घेतले जाईल.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, गोल्डमन सॅचस् (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे आहेत.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

आघाडीची गुंतवणूक कंपनी जनरल अटलांटिकने नुकतीच घोषणा केली आहे त्यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये टीबीओमध्ये एक अल्प हिस्सेदारी अधिग्रहित केली आहे.

टीबीओ जागतिक ट्रॅव्हल आणि टुरिजम बाजारपेठेत कार्यरत आहे, २०१७ मध्ये या बाजारपेठेची आर्थिक उलाढाल १.७ ट्रिलियन यूएस डॉलर्स होती. २०२३ मध्ये ट्रॅव्हल आणि टुरिजम उद्योगक्षेत्र वेगाने आपल्या पूर्व स्थितीला येईल अशी अपेक्षा आहे. २०२२ पासून साल-दर-साल १८.२% दराने वाढत १.९ ट्रिलियन यूएस डॉलर्सपर्यंत पोहोचेल, ८.२% सीएजीआरने वाढत २०२७ मध्ये २.६ ट्रिलियन यूएस डॉलर्सपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

%d