fbpx
Thursday, December 7, 2023
ENTERTAINMENTLatest News

वाणी कपूर नॉस्टॅल्जिक झाली “मी आधीच माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना खूप मिस करत आहे”

 

वाणी कपूरने नेहमीच छान पैकी तयार होवून दिवाळी घरात साजरी केली आहे. तिचे आई-वडील जिथे राहतात तिथे दिल्लीत असो किंवा मुंबईत मित्रांसोबत असो, ती दरवर्षी उत्सवात सहभागी होऊन साजरी करते. पण या वर्षी वाणी या सणा दरम्यान काम करणार आहे.. ती लंडनमध्ये एका आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

वाणीला तिच्या पालकांसोबत राहणे आणि कुटुंब आणि जवळच्या मित्रांसह एक जिव्हाळ्याची दिवाळी साजरी करणे चुकणार आहे. वाणी म्हणाली, “मी या वर्षीची दिवाळी लंडनमध्ये घालवणार आहे! दरवर्षी मी पूजेचा भाग बनून, माझ्या लोकांसोबत दिवे लावून आणि काही घरगुती स्वादिष्ट पदार्थ खाऊन माझ्या कुटुंबासह दिल्लीत ती साजरी करण्यास उत्सुक असते.”

ती आनंदी वेळ घालवण्यासोबत आणि साजरी करण्याच्या पारंपारिक पद्धतींचा आनंद घेण्यासोबत येणारी उबदारता आणि प्रेमाची कदर करते. पण तिची कामाची बांधिलकी तिला घरापासून दूर ठेवत आहे.

ती पुढे म्हणाली, ‘जेव्हाही मी मुंबईत सण साजरा केला आहे, तेव्हा माझ्या मित्रांनी तो माझ्यासाठी खास बनवला आहे. मात्र या वर्षी मी घरातील आनंदी उत्सवाच्या भावनेपासून दूर आहे आणि मी आधीच माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना खूप मिस करत आहे. या वर्षी मी माझ्या आगामी चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूसोबत दिवाळी साजरी करणार आहे. मी काही पारंपारिक भारतीय खाद्यपदार्थ खाईन आणि उत्सवात रंगुन जाईल.”

वर्क फ्रंटवर, वाणी कपूर मॅडॉक फिल्म्स ची सर्वगुण संपन्ना, आणि यशराज फिल्म्स चा ओटीटी शो एक भयंकर क्राइम थ्रिलर, मंडला मर्डर्स या दोन वेगवेगळ्या प्रॉजेक्ट्स मध्ये दिसणार आहे, जे पुन्हा तिच्या जबरदस्त अभिनयाचे प्रदर्शन करेल.

Leave a Reply

%d