पुलवामा घडले नसते तर काँग्रेस २०१९ सालीच् केंद्रात सत्तेत आली असती…! – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
मुंबई : मध्य प्रदेश, भोपाळ येथील निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी `काँग्रेसला पुढील १०० वर्षे सत्तेपासून दूर ठेवा`असे अवाजवी आवाहन जनतेला केले. मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जोरदार टीका केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’ने या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे
की, “लोकशाही ही लोकांच्या इच्छेवर चालते, नरेंद्र मोदी यांच्या नाही, हे मोदींनी जाणुन घ्यावे. १०० वर्षे तर लांब राहीले… ‘जर पुलवामाची घटना घडली नसती, तर २०१९ मध्येच काँग्रेस पुन्हा केंद्रात सत्तेत आली असती आणि देशाचे झालेले भयंकर नुकसान देखील टळले असते’…. कारण पंप्र मोदी आपल्या ‘पहील्या पंचवार्षिक कामगिरीचे’ पत्रकार परीषद घेऊन समर्थन ही करू शकले नाहीत व त्यावर मतें ही मागीतली नाहीत..!
प्रदेश काँग्रेसच्या प्रसिद्धिपत्रकात काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी म्हणाले की, ‘काँग्रेसशासित कार्यकाळाच्या तुलनेत, मोदी सरकारच्या कार्यकाळातील’ विकास दर, भूक निर्देशांक, महागाई निर्देशांक, बेरोजगारी, वाढते कर्ज, वाढता हिंसाचार व असुरक्षितता, वाढत्या शेतकरी आत्महत्या यांची ‘स्वकाळाशी तुलना’ मोदीजी करू शकत नाहीत.
भाजपचे शिर्ष नेतृत्व मा नरेंद्र मोदी यांनी खरेतर पंतप्रधान पदाचे संविधानीक महत्व लक्षांत घेता जबाबदारीने विधाने करणे गरजेचे आहे. मोदींनी आपल्या कार्यकाळातील विकासाचे आकडे पत्रकार परीषद घेऊन जनतेसमोर ठेवावेत व सरकारच्या लोकशाही धर्माच्या ऊत्तरदायीत्वाचे पालन करावे, केवळ आकस भावनेने विरोधकांवर गरळ ओकु नये.
ज्या काँग्रेसने, देशातील कोणीही व्यक्ती उपाशी झोपू नये, यासाठी `अन्नसुरक्षा कायदा` आणून गरिबांना अन्न उपलब्ध करून दिले, त्या काँग्रेसबद्दल मोदींनी बोलावे (?) की, ‘काँग्रेस सत्तेत आली तर गरिबांना अन्न मिळणे कठीण होईल (?),हे विधान बेजबाबदार, हास्यास्पद, बालीशपणाचे व अवास्तविक आहे.
काँग्रेसकडून जेंव्हा गरिबांना निःशुल्क किंवा माफक किमतीत अन्न-धान्य, गॅस सिलिंडर दिले जाते, त्याला मोदीजी “मुफ्त की रेवडिया” शब्द वापरून हिणवत होते. आता मात्र #श्रेयजीवी निलाजरेपणाने स्वतः वाटपाचे श्रेय घेऊ पहात आहेत, यातुन पंतप्रधान मोदींचा दुटप्पीपणाच दिसतो.
‘स्वातंत्र्योत्तर लोकशाहीरुपी भारताची’ निर्मितीच काँग्रेस ने केली आहें. १९४७ पासुन देशाचे ऐक्य, सामाजिक सलोखा व शांतता जोपासत, वाढत्या लोकसंख्ये बरोबरच विकास व रोजगारीचा वेग संभाळत, ६५ वर्षात महागाई नियंत्रित ठेवण्याचे व लोकांची क्रयशक्ती वाढवण्याचे महतकार्य काँग्रेस ने केले, तसेच ‘काँग्रेस प्रणीत युपीए काळांत’ २३ कोटी जनतेस दारिद्र्य रेषे बाहेर काढण्याचे महतकार्य झाले’ हे डॉ मनमोहन सिंग यांनी ‘खुली पत्रकार परीषद’ घेऊन सांगीतले व पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाऊन आपले उत्तरदायीत्व निभावले होते, याचे स्मरण ही काँग्रेस देत असल्याचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी म्हणाले.