fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

अनिरुद्ध देशपांडे यांना समाजपरिवर्तन पुरस्कार प्रदान 

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या वतीने सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांना समाजपरिवर्तन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना गौरविण्यात आले.
रोटरीचे नियोजित प्रांतपाल शीतल शहा, रोटरी क्लब आॅफ पुणे कात्रजचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सचिव अस्मिता पाटील, पुष्कराज मुळे, विवेक कुलकर्णी, नितीन नाईक यावेळी उपस्थित होते.
सुर्योद्य पारधी आदिवासी आश्रमशाळा खामगाव येथील काम अनिरुद्ध देशपांडे यांच्या अमानोरा येस फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जाते. याशिवाय अमानोरा अवंतिका क्लबच्या माध्यमातून  घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आरोग्य शिबिरे राबविण्यात येतात. तसेच कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले जाते. त्यांच्या या कार्याची दखल घेत रोटरी क्लब आॅफ पुणे कात्रजच्या वतीने सन्मान करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज च्या वतीने मागील २२ वर्षे आदर्श गणेश मंडळ स्पर्धा भरवली जाते. स्वारगेट ते कात्रज सॅलिसबरी पार्क ते सहकार नगर मधील मंडळे या स्पर्धेत सहभागी होतात. यावर्षी एकशे दहा मंडळांना बक्षीस देण्यात  यामध्ये आदर्श मित्र मंडळ धनकवडी यांनी प्रथम क्रमांक, ऋतुराज मित्र मंडळ मार्केट यार्ड, अजिंक्य मित्र मंडळ पद्मावती, साईनाथ मित्र मंडळ कात्रज, अंकुश मित्र मंडळ इंदिरानगर यांना अनुक्रमे पाच क्रमांक मिळाला आहे.

या व्यतिरिक्त उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. सोसायटी विभागातील ट्रेझर पार्क संत नगर यांना प्रथम क्रमांक, ऋतुरंग मित्र मंडळ द्वितीय तर ममता फाउंडेशन तृतीय क्रमांक पटकाविला. चंद्रशेखर कोरडे यांच्यासह ७ परीक्षकांनी परीक्षण केले.

Leave a Reply

%d