रिवाज में रज्जमाताज: पॅण्टालून्सच्या डोमिनो-नेतृत्वित रांगोळीने पुणेकरांसह अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचे लक्ष वेधून घेतले
पुणे : पुणे शहरामध्ये कलाकृती व नाविन्यतेचे भव्य संयोजन पाहायला मिळाले. आदित्य बिर्ला फॅशन अॅण्ड रिटेल लि. अंतर्गत सुप्रसिद्ध फॅशन ब्रॅण्ड पॅण्टालून्सने भव्य रांगोळीचे अनावरण केले, जी पूर्णत: डोमिनोजपासून तयार करण्यात आली होती.
पॅण्टालून्स विविध सांस्कृतिक परंपरांचा अवलंब करण्याप्रती कटिबद्धतेसाठी ओळखली जाते. ब्रॅण्ड तरूण ग्राहकांना संस्मरणीय अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहे. यंदा सणासुदीच्या काळात रज्जामाताजच्या उत्साहाची भर करण्यासाठी, तसेच अद्वितीय संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी पॅण्टालून्सने डोमिनो क्षेत्रात उल्लेखनीय ट्रॅक रेकॉर्ड असलेले आर्टिस्ट्स करण सिंग व मंझर आलम यांच्यासोबत सहयोग केला.
या दोन सर्जनशील विचारवंतांनी एकसंधी व लक्षवेधक पॅटर्न तयार केले, जेथे 16000 हून अधिक डोमिनोजमध्ये रांगोळी व डोमिनो कलेचे सार कॅप्चर करण्यात आले. आर्टिस्ट्सना एकत्र 400 चौरस फूट रांगोळी तयार करण्यासाठी 70 तास लागले.
अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी पहिल्या डोमिनोला ट्रिगर करत उत्साहाची भर केली. त्यांनी सुरेखरितया तयार केलेल्या स्पायरल्सच्या पॅटर्नचे अनावरण केले, जी कालातीत रांगोळी परंपरेला मानवंदना आहे. फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम पुणे येथे मॉलला भेट दिलेल्या अभ्यागतांनी या असाधारण सेलिब्रेशनचा मनसोक्त आनंद घेतला.