Tuesday, July 7, 2026
BusinessLatest News

अल्फा ७सी मालिकेतील दोन नवीन कॅमेरे सोनी इंडिया बाजारात आणणार

नवी दिल्ली : फूल फ्रेम व बदलता येण्याजोगे (interchangeable) लेन्स असलेले आणि नेटका व लहान आकार ही खासियत  असणाऱ्या अल्फा ७सी कॅमेऱ्यांच्या मालिकेमध्ये अल्फा ७सीII आणि अल्फा ७सीआर (Alpha 7C II and Alpha 7CR) हे नवीन दोन कॅमेरे बाजारात आणण्याची सोनी इंडियाने आज घोषणा केली.

अल्फा ७सी II कॅमेऱ्याची ठळक वैशिष्ठ्ये:

  • उच्च दर्जाची प्रतिमा मिळावी यासाठी या कॅमेऱ्यामध्ये जवळपास ३३.० प्रभावी मेगापिक्सेल आणि नवीनतम बिओंज एक्सआर इमेज प्रोसेसिंग इंजिनसह (BIONZ XR® image processing engine) फूल फ्रेम बॅक इल्युमिनेटेड एक्स मोर आर सीमॉस सेन्सर (full-frame back-illuminated Exmor R® CMOS sensor) आहे. प्रवासापासून दैनंदिन आयुष्यातील क्षणांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या दृश्यांना स्थिर प्रतिमा (फोटो) किंवा चलचित्र (मूव्ही) या दोन्ही प्रकारांमध्ये चित्रित करताना  वापरकर्ते अगदी सहजपणे उच्च दर्जाची प्रतिमा टिपण्याचा आनंद घेऊ शकतात.
  • अंदाजे १३१.३ मिमी*९६.४ मिमी*७९.८ मिमी आणि वजनाने जवळपास ६५८ gअसणाऱ्या अल्फा ७सी IV कॅमेऱ्याच्या तुलनेत हा अल्फा ७सी II वजनाने २२% हलका असून याचे वॉल्यूम ४५% पर्यंत कमी आहे.
  • स्थिर प्रतिमा (फोटो) किंवा चलचित्र (मूव्ही) या दोन्ही प्रकारांसाठी प्रमाणित आयएसओ सेन्सिटीव्हिटिज १०० पासून ५१२०० पर्यंत (स्थिर प्रतिमांसाठी ५० ते २०४८०० पर्यंत विस्तारीत) असल्याने या कॅमेऱ्याद्वारे उच्च दर्जाची संवेदनशीलता मिळते आणि आजूबाजूच्या गोंगाट व आवाजाशिवाय चित्रीकरण करता येते.

अल्फा ७सीआर कॅमेऱ्याची ठळक वैशिष्ठ्ये:

  • उच्च गुणवत्तेचे रिसोल्यूशन आणि उच्च डिफिनेशन प्रतिमा मिळावी यासाठी या कॅमेऱ्यामध्ये जवळपास ६१.० प्रभावी मेगापिक्सेल आणि नवीनतम बिओंज एक्सआर इमेज प्रोसेसिंग इंजिनसह (BIONZ XR® image processing engine) फूल फ्रेम बॅक इल्युमिनेटेड एक्स मोर आर सीमॉस सेन्सर (full-frame back-illuminated Exmor R® CMOS sensor) आहे.
  • अंदाजे १३१.३ मिमी*९६.९ मिमी*८२.४ मिमी आणि वजनाने जवळपास ७२३ gअसणाऱ्या अल्फा ७आयव्ही (Alpha 7 IV) कॅमेऱ्याच्या तुलनेत हा अल्फा ७सीआर (α7C II) वजनाने २९% हलका असून याचे वॉल्यूम ५३% पर्यंत कमी आहे.
  • स्थिर प्रतिमा (फोटो) किंवा चलचित्र (मूव्ही) या दोन्ही प्रकारांसाठी प्रमाणित आयएसओ सेन्सिटीव्हिटिज १०० पासून ते ३२००० ((स्थिर प्रतिमांसाठी ५० ते १०२४०० पर्यंत विस्तारीत) पर्यंत आहे.
  • याशिवाय यामध्ये असलेल्या ७.० स्टेप ऑप्टिकल ५-एक्सिस स्थिरतेसोबतच अगदी १-पिक्सेल वर जरी अंधुक किंवा धूसर झाले तरी हा कॅमेरा ते शोधतो आणि त्यामध्ये दुरुस्ती करतो.
  • यामध्ये पिक्सेल शिफ्ट मल्टी शूटिंग सुविधा आहे; जे एका पेक्षा जास्त प्रतिमा घेऊन कम्प्युटरवर त्यांना एकत्रित करून एक उच्च गुणवत्तेचे रिसोल्यूशन असलेली प्रतिमा तयार करते.
  • अल्फा ७सीआर (Alpha 7CR) मध्ये समाविष्ट केलेले जीपी -एक्स२ (GP-X2) या ग्रिप एक्सटेन्शनमुळे तुम्ही अधिक वेळ चित्रीकरण करत असताना किंवा टेलिफोटो लेन्स वापरत असतानासुद्धा कॅमेरा स्थिर ठेऊन सहजतेने व आरामात चित्रीकरण करू शकता.

 अल्फा ७सी II आणि अल्फा ७सीआर यांच्यामधील काही सामायिक ठळक वैशिष्ठ्ये:

१.   नेटका लहान आकार आणि सोबत घेऊन फिरण्यास अतिशय सोपे

२.   कॅमेऱ्याच्या अंतर्गतच समाविष्ट असणाऱ्या एआय प्रोसेसिंग युनिटमुळे ज्या वस्तूला चित्रित करायचे आहे त्यास ओळखून टिपणे अधिक सुधारले असून त्याचबरोबर एएफ कार्यप्रदर्शन देखील आहे.

३.   व्हिडिओमध्ये अतिशय प्रगत असे कार्यप्रदर्शन आहे. अल्फा ७सी II कॅमेरा ७के एवढे आणि अल्फा ७ सीआर कॅमेरा ६के एवढे, उच्च रिसोल्यूशनचे आणि तपशीलवार व्हिडीओ डेटा संक्षेपित करून उच्च दर्जाचे ४के व्हिडीओ देऊ शकतात.

४.     सहज वापर आणि सहज जोडता येणे. केवळ स्पर्श करून वापरता येणारे वॅरी-अॅंगल एलसीडी मॉनिटर, नवीन व आधुनिक टच मेन्यूसह इंटिटयू कामकाज चित्रीकरण सहज व सोपे करते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading