Monday, August 31, 2026
ENTERTAINMENTLatest News

सलमान – कतरिना च्या ‘टायगर 3’ चा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

यशस्वी टीझर, ट्रेलर आणि लेके प्रभु का नाम या पहिल्या गाण्यानंतर, YRF ने आज टायगर 3 मधील 50-सेकंदांच्या टाइगर इज बैक व्हिडिओ अॅसेटसह प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे ! यात सलमान खान उर्फ टायगर हे एका खलनायकापासून भारताचे रक्षण करणारा वन-मॅन आर्मी आहे.

जगभरातील प्रेक्षकांसाठी, टायगर 3 हा YRF स्पाय युनिव्हर्सचा एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे ज्याने फक्त ब्लॉकबस्टर्स दिले आहेत! एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाण यांच्‍या इव्‍हेंटला अनुसरून या इंटरकनेक्टेड फ्रँचायझी चा हा पाचवा चित्रपट आहे!

या अॅक्शन प्रोमोमध्ये,  एजंट  सलमान टाइगर सलमान खानला चित्रपटातील विलन मास्टरमाइंड  इमरान हाश्मीकडून धमकी दिली जात आहे. तो विलन निर्दयपणे भारताला दुखावणार आणि भारतीयांची शिकार करणार असल्याचे जाहीर करतो.

टायगर 3 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात मोठे मेगास्टार सलमान खान आणि कतरिना कैफ आहेत जे त्यांच्या सुपर स्पाईस टायगर आणि झोयाच्या प्रतिष्ठित भूमिकेत आहेत! आदित्य चोप्रा निर्मित आणि मनीश शर्मा दिग्दर्शित, टायगर 3 या दिवाळीत, 12 नोव्हेंबर, रविवारी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading